Homeताज्या बातम्या*पुणे-नसरापूर घटनेच्या निषेधार्थ लोकमान्य टिळक पुतळा परिसरात जनक्षोभ; ‘शक्ती’ कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी...

*पुणे-नसरापूर घटनेच्या निषेधार्थ लोकमान्य टिळक पुतळा परिसरात जनक्षोभ; ‘शक्ती’ कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी फलटण*

नराधमाला फाशी द्या, अन्यथा आमच्या ताब्यात द्या; फलटणमध्ये नसरापूरच्या घटनेचा कडाडून निषेध

पुणे-नसरापूर घटनेच्या निषेधार्थ लोकमान्य टिळक पुतळा परिसरात जनक्षोभ; ‘शक्ती’ कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी फलटण

फलटण । ४ मे २०२६ ।

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका बालिकेवर झालेल्या अत्यंत दुर्दैवी आणि अमानुष घटनेच्या निषेधार्थ फलटणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नाशिक केंद्र, फलटणच्या वतीने आज शंकर मार्केट येथील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात एकत्र येऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांनी, “त्या नराधमाला फाशी द्यावी, अन्यथा त्याला आमच्या ताब्यात द्यावे, आम्ही त्याचा योग्य तो बंदोबस्त करू,” असा संतप्त आणि एकमुखी नारा दिला.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा दाखला दिला. ज्याप्रमाणे महाराजांनी रांजाच्या पाटलाला त्याच्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा दिली होती, तशीच शिक्षा या नराधमाला देऊन समाजात एक कडक संदेश द्यावा, अशी मागणी करण्यात आली. समाजातली संवेदनशीलता संपत चालली असून अशा घटना वारंवार घडणे हे दुर्दैवी असल्याचे मत मान्यवरांनी नोंदवले.

अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी आणि आरोपींना तातडीने कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने ‘शक्ती’ कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून आरोपीला लवकरात लवकर फाशीच्या खांबावर चढवावे, हीच संपूर्ण फलटणकरांची भावना असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या निषेध सभेला फलटण शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, व्यापारी बांधव, विविध सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी काळ्या फिती लावून आणि घोषणाबाजी करून या घटनेचा निषेध केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फलटण फेस्टिव्हलचा दिमाखदार समारोप; ‘महाराष्ट्राची मायबोली’ कार्यक्रमातून मराठी संस्कृतीचे दर्शन मराठी भाषा, लोकसंस्कृती...

0
फलटण फेस्टिव्हलचा दिमाखदार समारोप; ‘महाराष्ट्राची मायबोली’ कार्यक्रमातून मराठी संस्कृतीचे दर्शन मराठी भाषा, लोकसंस्कृती आणि परंपरेचा जागर; फलटणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी...

फलटणमध्ये गजानन चौक ते दगडी पूल रस्त्याचे काम पुन्हा सुरू! नगरसेविका सिद्धाली शहा...

0
फलटणमध्ये गजानन चौक ते दगडी पूल रस्त्याचे काम पुन्हा सुरू! नगरसेविका सिद्धाली शहा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांना मोठा दिलासा समर्थ 24...

फलटणमध्ये गजानन चौक ते दगडी पूल रस्त्याचे काम पुन्हा सुरू!   नगरसेविका सिद्धाली शहा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांना मोठा दिलासा फलटण, प्रतिनिधी...

शरयु अॅग्रो इंडस्ट्रीजचा १२ वा गळीत हंगाम उत्साहात सुरू; यंदा गाळप क्षमता दुप्पट करण्याचे...

0
शरयु अॅग्रो इंडस्ट्रीजचा १२ वा गळीत हंगाम उत्साहात सुरू; यंदा गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट! कापशीत पारंपरिक मोळीपूजनाने गळीत हंगामाचा शुभारंभ; दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक...

फलटण फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्राच्या लोककलेचा जागर; लावणीच्या ठेक्यावर रसिक मंत्रमुग्ध!

0
फलटण फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्राच्या लोककलेचा जागर; लावणीच्या ठेक्यावर रसिक मंत्रमुग्ध! दापोलीच्या नामवंत लावणी कलाकारांच्या बहारदार सादरीकरणाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य लावणी महोत्सव उत्साहात संपन्न समर्थ...

error: Content is protected !!