Homeताज्या बातम्या*फलटणमध्ये अंतरधर्मीय ५६ वा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न*

*फलटणमध्ये अंतरधर्मीय ५६ वा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न*

*फलटणमध्ये अंतरधर्मीय ५६ वा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न*

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण

“सत्यशोधक विवाह सत्यावर आधारित असल्याने सर्व जाती-धर्मांमध्ये त्याचे अनुकरण व्हावे,” असे प्रतिपादन सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी केले.

फलटण दि. 3 मे 2026 फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त प्रा. अॅड. करिष्मा मुलाणी आणि प्रा. श्रेयस कांबळे यांचा ५६ वा अंतरधर्मीय मोफत सत्यशोधक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

हा विवाह सोहळा अक्षत रेसिडेन्सी, जाधववाडी येथे रविवारी सायंकाळी 6 वाजता मोजक्या मित्रमंडळी व नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. विवाहाची अधिकृत नोंदणी करून महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधी पार पाडण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या हस्ते नवदांपत्याला सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र तसेच महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा. सुदाम धाडगे यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले, तसेच महात्मा फुले रचित मंगलाष्टकांचे सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक अक्षतांच्या ऐवजी सुगंधी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आला.

विवाह सोहळ्याची सुरुवात

नवदांपत्याच्या संविधान आणि समग्र वाङ्मय हातात घेऊन आगमनाने झाली. त्यानंतर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून पूजन करण्यात आले. उपस्थितांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ व गुलाबाचे रोप भेट देण्यात आले.

यावेळी प्रा. श्रेयस कांबळे व प्रा. करिष्मा मुलाणी यांनी शपथपत्र वाचन करून संविधानिक मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच निर्भय व सत्यशोधक समाज घडविण्याचे आश्वासन दिले. करिष्मा मुलाणी यांनी आभार प्रदर्शन करताना ‘तयास मानव म्हणावे का’ ही कविता सादर केली, तर कांबळे कुटुंबीयांनीही काव्यसादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

या प्रसंगी पत्रकार विकास शिंदे,पत्रकार जयदीप भगत ज्येष्ठ समाजसेवक दादा कांबळे, विजय आमने, लॉ कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नवदांपत्याचे अभिनंदन करत त्यांच्या कृतीशील विचारसरणीचे कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले : रोहित पवार

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याने बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डोके वर काढत असल्याचा दावा...

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

महा सर्वेक्षण पॉलिसीसाठी 54L एकल महिलांची ओळख पटवते, संख्या 75L पर्यंत वाढू शकते

पुणे: महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले की, अशा एकल महिलांची संख्या आता 54 लाखांच्या आसपास आहे, परंतु समाजातील या विभागासाठी...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

error: Content is protected !!