फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा
सोनगाव बंगला येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सोनगाव बंगला, ता. फलटण, जि. सातारा येथे राहत्या घराच्या पाठीमागील परिसरात एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी निदर्शनास आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसो गणपत हजार, वय ४२ वर्षे, रा. सोनगाव बंगला, ता. फलटण, जि. सातारा हे घराच्या पाठीमागील परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर कुटुंबीय व उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सकाळी अंदाजे ०७.१५ वाजता त्यांना मृत घोषित केले.
सदर घटनेबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक १२०/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०९.१५ वाजता नोंद करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी पोलीस ठाण्याच्या वतीने आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येत असून, पुढील तपास पोलीस हवालदार खरात हे करीत आहेत.
भेट देणारे अधिकारी : सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबनावळ
तपास अधिकारी : पोलीस हवालदार खरात
पोलीस ठाणे : फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा
— फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, सातारा


























