Homeताज्या बातम्याफलटण शहर पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांचा समर्थ प्रतिष्ठानतर्फे सन्मान; गणेश विसर्जन...

फलटण शहर पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांचा समर्थ प्रतिष्ठानतर्फे सन्मान; गणेश विसर्जन मिरवणुकीत भाविकांना पाणी वाटप उपक्रम

फलटण दि.०७| फलटण शहरातील गणेशोत्सवाची सांगता विसर्जन मिरवणुकीने उत्साहात पार पडली. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर पोलिसांनी केलेल्या काटेकोर नियोजनामुळे संपूर्ण मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पार पडली. या कार्याची दखल घेत समर्थ प्रतिष्ठान व रमन भोईटे मित्र परिवार यांच्या वतीने शहर पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

गणपती विसर्जनासाठी शहरातील प्रमुख चौक, रस्ते व गर्दीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महिला पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखा व स्वयंसेवक यांच्या मदतीने वाहतुकीचे नियोजन सुरळीत झाले. त्यामुळे कोणतीही कोंडी किंवा गोंधळ न होता विसर्जन मिरवणूक यशस्वीपणे संपन्न झाली.

मिरवणुकीदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात आली. संवेदनशील भागांमध्ये विशेष पोलीस तळ उभारून सुरक्षा अधिक बळकट करण्यात आली होती. शहरातील गणेश मंडळांनीही शिस्त पाळून पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले.

फलटणकरांनी पोलिस प्रशासनाच्या या कार्यशैलीचे मनःपूर्वक कौतुक केले. त्याचबरोबर, विसर्जन मिरवणुकीत भाविकांना पाणी वाटप करून समर्थ प्रतिष्ठान व रमन भोईटे मित्र परिवार यांनी आपले सामाजिक भान अधोरेखित केले.

यावेळी उपक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अॅड. मा. श्री. धीरज टाळकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी स्वतःही भाविकांना पाणी वाटप करून या उपक्रमात सहभाग नोंदवला.या प्रसंगी सातारा विभागीय संपादक हिंदुराव गायकवाड, श्री. मधुकर खुटाळे सर, भोलेनाथ भोईटे, नवनाथ भोईटे, रमण भोईटे, अमित साळुंखे, यश घाडगे, अमोल काकडे, उदय भोसले, धनंजय धोंगडे, रमेश ठोंबरे, दिपक ठोंबरे, सागर भोईटे, सागर डोईफोडे, बंडु दोशी, अनिल करचे, कैलास सोडमिसे, संतोष दगडे, संतोष भोईटे, सचिन वाघ, सचिन शेळके, अंकुश डबरी, बबन बनकर, विठ्ठल बनकर, अमर पवार, अनिकेत पवार, मधु बनकर, अजित पोकळे, राहुल शिंदे, राहुल भुजबळ, सचिन भुजबळ, गणेश ननवरे, अशोक जाधव, प्रशांत शिंदे, हरी रासने, तेजस पवार, निलेश गायकवाड, मुदस्सर महात, सनी भोईटे, अक्षय जगताप, पप्पू घाडगे, दिनेश रासने, नंदू रमेश ठोंबरे, आंबेकर राजू काशीद, माधु पवार, तसेच चौधरवाडी गावांचे तंटामुक्त अध्यक्ष श्री. मोरेश्वर जाधव हे उपस्थित होते.याशिवाय समर्थ प्रतिष्ठान फलटणचे सचिव गणेश भोईटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतात

0
पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रिट ऑपरेटर्सनी संबंधित सर्व प्राधिकरणांनी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार करेपर्यंत उत्पादन थांबवले आहे, तरीही नागरी संस्थेने वनस्पतींवर कारवाई सुरू ठेवली...

पहिल्या सीबीएसई इयत्ता दहावीच्या दुहेरी परीक्षेत, उत्तीर्णतेचा दर 93.7% पर्यंत वाढला; पुण्याच्या विद्यार्थ्यांनी जोरदार...

0
पुणे/मुंबई: बुधवारी जाहीर झालेल्या CBSE इयत्ता दहावीच्या निकालांमध्ये राष्ट्रीय उत्तीर्णतेच्या टक्केवारीत किरकोळ वाढ होऊन 93.7% झाली, परंतु पुणे विभागाची भक्कम कामगिरी आणि...

पुण्यातील छेडछाडीच्या आरोपांवर इन्फोसिसचे निवेदन; नाशिक टीसीएस प्रकरणानंतर छाननीत वाढ

0
पुणे: आयटी क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिसने बुधवारी त्यांच्या पुण्यातील बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) सुविधेवर कामाच्या ठिकाणी छळवणूक केल्याच्या सोशल मीडियाच्या आरोपांना औपचारिक प्रतिसाद...

1 मार्चपासून राज्यात उष्माघाताचे 15 रुग्ण

0
पुणे: वाढत्या कमाल तापमानामुळे महाराष्ट्रात 1 मार्च ते 13 एप्रिल दरम्यान उष्माघाताची 15 प्रकरणे समोर आली असून, डॉक्टर आणि रहिवासी चिंतेत आहेत.राज्याच्या आरोग्य विभागाच्या...

रावेत येथील रहिवाशांनी जमिनीची खोटी पावती वापरून नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : रावेत पोलिसांनी परिसरातील एका रहिवाशाविरुद्ध आपल्या नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने रावेत परिसरात त्याच्या नातेवाईकांच्या...

error: Content is protected !!