फलटण : शहरात १ मे रोजी साजऱ्या झालेल्या तथागत गौतम बुद्ध जयंती मिरवणुकीत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी रात्री १० वाजता वाद्य बंद करण्यास सांगितले.ही मिरवणूक शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असताना या निर्णयामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली. जयंतीत केवळ बुद्ध वंदना व प्रबोधनात्मक गीतेच वाजवली जातात .
दरम्यान, नागरिकांनी आरोप केला की ज्या तत्परतेने पोलिसांनी वेळेचे निर्बंध लागू केले, त्याच तत्परतेने शहरातील मटका, जुगार, अवैध दारू विक्री, वेश्याव्यवसाय यांसारख्या बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई होत नाही.
या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस प्रशासन दुहेरी भूमिका घेत असल्याची टीका होत असून, सोशल मीडियावरही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
अॅड. शाम अहिवळे, मंगेश आवळे, हरीश काकडे, अॅड. अनिकेत अहिवळे, संग्राम अहिवळे, प्रफुल अहिवळे, प्रवीण काकडे, विकी बोके, प्रीत खानविलकर, सुधीर अहिवळे आदींनी या घटनेचा निषेध नोंदवला असून, नियम सर्वांसाठी समान लागू करावेत, अशी मागणी केली आहे


























