Homeताज्या बातम्याबेटी बचाव-बेटी पढाव योजनेचा शंभर टक्के निधी खर्च करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

बेटी बचाव-बेटी पढाव योजनेचा शंभर टक्के निधी खर्च करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा दि. 22 : बेटी बचाव-बेटी पढाव योजनेंतर्गत मिळालेला निधी शंभर टक्के खर्च करा. या निधीतून सातारा जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढेल यासाठी महिला व बाल विकास विभागाने प्रभावी कार्यक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बेटी बचाव -बेढी पढाव जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला महिला व बाल विकास अधिकारी राजश्री बने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( बाल कल्याण) नागेश ठोंबरे, पर्यवेक्षाधिकारी तुषार सुरत्रांन, संरक्षण अधिकारी अजय सपकाळ आदी उपस्थित होते.

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी बेटी बचाव-बेटी पढाव योजनेंतर्गत गर्भनिदान प्रतिबंध अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करुन त्याची जनजागृती करा,असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, या अधिनियमांबाबत जनजागृती व्हावी यासाठी आरोग्य विभागाच्या मदतीने शिबीरांचे व चर्चासत्रांचे आयोजन करावे. जिल्हा महिला व बाल विकास विभागाने बेटी बचाव-बेटी पढाव योजनेची नवनवीन कल्पनेतून प्रभावी अंमलबजावणी करावी. यासाठी आराखडा तयार करावा. तज्ञ व्यक्तींकडून जींगल्स, व्हिडीओ तयार कराव्यात. शेवटच्या घटकांपर्यंत या योजनेची प्रचार व प्रसिद्धी करावी.

बाल विवाह होऊ नयेत म्हणून त्याचीही जनजागृती करा, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील बाल गृहातील मुलांना सोयी-सुविधा मिळतात का याची पहाणी करावी. आणखीन सुविधा पाहिजे असतील तर त्या सीएसआर फंडातून देता येईल यासाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तज्ञांनी प्रोबायोटिक्स, आतड्यांवरील उपचारांचा विज्ञान-आधारित वापर करण्याचे आवाहन केले आहे

किण्वन आणि मायक्रोबायोम थेरप्यूटिक्स कॉन्फरन्समधील उपस्थित पुणे : आरोग्यसेवेचे भवितव्य केवळ रोगावर उपचार करण्यामध्ये नाही तर मानवी आतड्यांसंबंधीच्या परिसंस्थेचे सखोल ज्ञान आणि प्रोबायोटिक्सच्या...

लोहगड किल्ला हत्याकांड: केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर ‘प्रेमी’ सिया गोयल-चेतन चौधरी आता एकमेकांकडे बोटे दाखवत...

केतन अग्रवाल (आर), सिया गोयल (सी), चेतन चौधरी (एल) पुणे: पुण्याचे रिअल इस्टेट संचालक केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरून कथितरित्या त्याच्या मृत्यूस ढकलल्यानंतर,...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

प्रेयसीच्या इशाऱ्यावरून आरोपी चौधरीने लोहगड किल्ल्यावर रियाल्टरला ढकलून दिले.

पुणे : अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल हिच्यासोबत रचलेल्या योजनेनुसार 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन...

पावसामुळे वीज खंडित आणि चढ-उतार होतात

पावसामुळे शहरातील अनेक भागात अधूनमधून वीजपुरवठा खंडित झाला पुणे : बुधवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंढव्यात सुमारे चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित...

error: Content is protected !!