बारामती (प्रतिनिधी):दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी कसबा येथे श्री संत सावता माळी सभागृह या नूतन वास्तूचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. या सोहळ्याचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी संत सावतामाळी महाराज यांचे १९ वे वंशज ह.भ.प. श्री सावता महाराज वसेकर तसेच प्रभू महाराज माळी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला आपले शुभाशीर्वाद दिले.
कार्यक्रमास परिसरातील संतभक्त, ग्रामस्थ, समाजबांधव तसेच विविध मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या भूमिपूजन सोहळ्यामुळे कसबा परिसरात धार्मिक आणि सामाजिक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, श्री संत सावता माळी सभागृहाच्या उभारणीमुळे समाजातील विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना नवी दिशा मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.



























