Homeताज्या बातम्यासागरी महोत्सव आणि जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा; "जबाबदार पर्यटन" पथ नाट्यद्वारे...

सागरी महोत्सव आणि जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा; “जबाबदार पर्यटन” पथ नाट्यद्वारे जागृती

पुणे, दि. 26 सप्टेंबर : पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत आसमंत बेनेव्हलस या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने सागरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जागतिक पर्यटन दिन देखील उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने विभागीय पर्यटन कार्यालय, पुणे यांच्या आवारात फर्ग्युसन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवकांनी “जबाबदार पर्यटन” या विषयावर पथनाट्य सादर केले. प्रवासादरम्यान पर्यावरण संवर्धन, स्थानिक संस्कृतीचा आदर, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि शाश्वत पर्यटनाचे तत्त्व अंगीकारणे या महत्त्वपूर्ण मुद्यांवर प्रभावी संदेश या पथनाट्यातून देण्यात आला.

आसमंत बेनेव्हलस ही संस्था समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात सक्रिय असून, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विविध कार्यक्रम सातत्याने आयोजित करत आहे. या संस्थेच्या सहकार्यामुळे सागरी महोत्सवास व्यापक सामाजिक स्वरूप लाभले.

पथनाट्याला विभागीय पर्यटन कार्यालयातील शासकीय कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवक स्वयंसेवकांच्या कलात्मक सादरीकरणाचे तसेच जबाबदार पर्यटन या महत्त्वपूर्ण विषयाचे उपस्थितांनी कौतुक केले.

पर्यटन संचालनालयाच्या वतीने सांगण्यात आले की, जबाबदार पर्यटन ही केवळ प्रवासाची संकल्पना नसून पर्यावरणपूरक व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील प्रवासाची जीवनशैली आहे. प्रवास करताना कचरा न टाकणे, स्थानिकांना रोजगार मिळवून देणाऱ्या सेवा वापरणे, स्थानिक संस्कृती व परंपरा जपणे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करणे हे जबाबदार पर्यटनाचे गाभ्याचे तत्त्व आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून सागरी महोत्सव आणि जागतिक पर्यटन दिन या दोन्ही कार्यक्रमांचे औचित्य साधत, समाजात पर्यटनाच्या जबाबदार दृष्टीकोनाचा संदेश पोहोचविण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दालवडीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श*

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दालवडीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण मुख्याध्यापक जयवंत सावंत यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न   दालवडी, प्रतिनिधी :...

पुणेकरांचा मुलगा लोहगड किल्ल्यावर 400 फूट पडून अपघात नव्हे खून; मंगेतर आणि तिच्या पुरुष...

लोहगड किल्ल्यावरील पुण्यातील एका ट्रेकरच्या (एल) मृत्यूने सुरुवातीला अपघाती वळण घेतले आहे. पोलिसांना आता संशय आहे की त्याची मंगेतर (आर) आणि तिच्या पुरुष...

*महात्मा फुले द्विशताब्दी जयंती व अहिल्यादेवी होळकर ३०१ वी जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण*

*महात्मा फुले द्विशताब्दी जयंती व अहिल्यादेवी होळकर ३०१ वी जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण : सुवर्ण परिस स्पर्श फाउंडेशनच्या...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

पुणे शहरातील ट्रॅफिक जॅममागील ६० पायाभूत आणि संबंधित समस्या पोलीस ओळखतात, सुधारात्मक उपायांसाठी पुणे...

पोलिसांनी खड्डे बुजवणे, रस्ता दुभाजकांचे सदोष दुरुस्त करणे, पदपथांची पुनर्रचना करणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिक्रमणे हटवणे या उपायांची शिफारस केली आहे. पुणे...

error: Content is protected !!