Homeताज्या बातम्या*एका बाजूला “पर्यावरण वाचवा”चे संदेश दिले जात असताना दुसऱ्या बाजूला वाढलेली झाडे...

*एका बाजूला “पर्यावरण वाचवा”चे संदेश दिले जात असताना दुसऱ्या बाजूला वाढलेली झाडे तोडली जात असल्याने प्रशासनाची दुहेरी भूमिका उघड होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. झाडे लावण्यापेक्षा* *ती जपणे अधिक महत्त्वाचे असून, फलटणमधील ही घटना पर्यावरण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे*.

फलटण वनखात्याकडून अक्षम्य चूक

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.

शहरातील विमानतळ शेजारील वन विभागाच्या जागेत असलेल्या झाडांची अचानक तोड झाल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षे जपून वाढवलेल्या या झाडांना वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी उन्हाळ्यात टँकर व बादल्यांद्वारे पाणी घालून संवर्धन केले होते. अशा झाडांची तोड झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, स्थानिकांच्या मते पूर्ण दहा वर्षे वाढलेली झाडे तोडणे हे अनाकलनीय आहे .या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरूनही स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे.

पर्यावरणप्रेमींनी काही ठोस प्रश्न उपस्थित केले आहेत. पर्यायी जागा उपलब्ध असताना झाडांनी भरलेलीच जागा का निवडली? झाडे तोडताना सर्व नियमांचे पालन झाले का? प्रतिपूरक वृक्षारोपणाची ठोस योजना काय आहे? या निर्णयाची जबाबदारी कोण घेणार? असे सवाल विचारले जात आहेत.

एका बाजूला “पर्यावरण वाचवा”चे संदेश दिले जात असताना दुसऱ्या बाजूला वाढलेली झाडे तोडली जात असल्याने प्रशासनाची दुहेरी भूमिका उघड होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. झाडे लावण्यापेक्षा ती जपणे अधिक महत्त्वाचे असून, फलटणमधील ही घटना पर्यावरण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा ‘आपुलकीची आरती’ उपक्रम कौतुकास्पद; एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचा नवा...

0
श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा ‘आपुलकीची आरती’ उपक्रम कौतुकास्पद; एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श! ४९ वर्षांची परंपरा जपत सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल; प्रत्येक चतुर्थीला...

फलटण फेस्टिव्हलचा दिमाखदार समारोप; ‘महाराष्ट्राची मायबोली’ कार्यक्रमातून मराठी संस्कृतीचे दर्शन मराठी भाषा, लोकसंस्कृती...

0
फलटण फेस्टिव्हलचा दिमाखदार समारोप; ‘महाराष्ट्राची मायबोली’ कार्यक्रमातून मराठी संस्कृतीचे दर्शन मराठी भाषा, लोकसंस्कृती आणि परंपरेचा जागर; फलटणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी...

फलटणमध्ये गजानन चौक ते दगडी पूल रस्त्याचे काम पुन्हा सुरू! नगरसेविका सिद्धाली शहा...

0
फलटणमध्ये गजानन चौक ते दगडी पूल रस्त्याचे काम पुन्हा सुरू! नगरसेविका सिद्धाली शहा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांना मोठा दिलासा समर्थ 24...

फलटणमध्ये गजानन चौक ते दगडी पूल रस्त्याचे काम पुन्हा सुरू!   नगरसेविका सिद्धाली शहा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांना मोठा दिलासा फलटण, प्रतिनिधी...

शरयु अॅग्रो इंडस्ट्रीजचा १२ वा गळीत हंगाम उत्साहात सुरू; यंदा गाळप क्षमता दुप्पट करण्याचे...

0
शरयु अॅग्रो इंडस्ट्रीजचा १२ वा गळीत हंगाम उत्साहात सुरू; यंदा गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट! कापशीत पारंपरिक मोळीपूजनाने गळीत हंगामाचा शुभारंभ; दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक...

error: Content is protected !!