Homeताज्या बातम्यानगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा महावितरणला इशारा; विनापरवाना कामे केल्यास गुन्हा दाखल...

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा महावितरणला इशारा; विनापरवाना कामे केल्यास गुन्हा दाखल करणार!

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा महावितरणला इशारा; विनापरवाना कामे केल्यास गुन्हा दाखल करणार!

**नवीन वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत खांबांच्या कामांसाठी NOC घेणे बंधनकारक करण्याची मागणी; ठेकेदारांच्या मनमानी कामांमुळे विकासकामांना अडथळे येत असल्याचा आरोप*

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

**फलटण :** फलटण नगरपरिषद हद्दीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरणकडून नवीन वीजवाहिन्या टाकणे, ट्रान्सफॉर्मर बसविणे, नवीन विद्युत खांब उभारणे तसेच खांब स्थलांतरित करण्याच्या कामांबाबत फलटण नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा कामांचे आदेश देण्यापूर्वी नगरपरिषदेचा ना हरकत दाखला (NOC) घेण्याची मागणी करूनही त्याचे पालन होत नसल्याचा आक्षेप नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर नोंदविला आहे. यापुढे नगरपरिषदेच्या परवानगीशिवाय किंवा अनधिकृतपणे कामे केल्यास महावितरण आणि संबंधित ठेकेदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी नगरपरिषद येथे एक बैठक आयोजित केली होती यामध्ये शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर महावितरणच्या फलटण विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. या पत्रात शहरातील वाढती लोकसंख्या, व्यापारी विस्तार आणि औद्योगिक गरजा लक्षात घेऊन महावितरणच्या कामकाजासंदर्भात आवश्यक सूचना व प्रस्तावांची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

### फेब्रुवारीतील पत्राकडे दुर्लक्ष झाल्याचा आक्षेप

नगरपरिषदेने यापूर्वी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पत्राद्वारे महावितरणला विविध सूचना दिल्या होत्या. त्या पत्रातील मुद्दा क्रमांक ९ नुसार, नगरपरिषद हद्दीत नवीन वीजवाहिन्या टाकणे, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, नवीन विद्युत खांब उभारणे किंवा विद्यमान खांब स्थलांतरित करणे अशा कामांपूर्वी नगरपरिषदेचा ना हरकत दाखला घेण्याची मागणी करण्यात आली होती.

मात्र, संबंधित कामांचे आदेश देण्यापूर्वी महावितरणकडून नगरपरिषदेचा NOC घेतला जात नसल्याचे १५ ऑक्टोबरच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. नगर परिषदेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता महावितरण व संबंधित ठेकेदार यांच्याकडून मनमानीपणे शहरात कामे सुरू आहेत. त्यामुळे यापूर्वी दिलेल्या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

### ठेकेदारांच्या मनमानीमुळे विकासकामांना अडथळे?

महावितरणने नियुक्त केलेले ठेकेदार आपल्या सोयीनुसार कामे करीत असल्याचा आक्षेप नगरपरिषदेने घेतला आहे. नगरपरिषदेच्या म्हणण्यानुसार, अशा कामांमुळे शहरातील विकासकामे करताना अडचणी निर्माण होत आहेत. रस्ते, सार्वजनिक सुविधा आणि इतर नागरी कामांच्या नियोजनाशी समन्वय न साधता विद्युत कामे केली जात असल्यास त्याचा परिणाम नगरपरिषदेच्या विकासकामांवर होऊ शकतो.

शहराचा वाढता विस्तार आणि भविष्यातील पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेता महावितरणच्या कामांचे नियोजन नगरपरिषदेशी समन्वय साधून होणे आवश्यक असल्याची भूमिका या पत्रातून मांडण्यात आली आहे.

### विनापरवाना कामांबाबत नगरपरिषदेची गंभीर भूमिका

फलटण नगरपरिषद हद्दीत महावितरणकडून विनापरवाना कामे सुरू असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. ही बाब गंभीर असल्याचे नमूद करून महावितरणने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यापुढे नगरपरिषद हद्दीत कोणतेही काम विनापरवाना किंवा अनधिकृतपणे केल्यास संबंधित महावितरण विभाग आणि ठेकेदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुधोजी महाविद्यालयात सातारा इतिहास संशोधन मंडळाचे १७ वे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न फलटण...

0
मुधोजी महाविद्यालयात सातारा इतिहास संशोधन मंडळाचे १७ वे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण संस्थानाच्या इतिहासावर अभ्यासपूर्ण मंथन; इतिहास संशोधन आणि ऐतिहासिक...

सातारा जिल्ह्यातून किमान ५०० बांधकाम कामगार २१ ऑक्टोबरच्या आंदोलनात सहभागी होणार! फलटण येथे...

0
  महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या आंदोलनात सातारा जिल्ह्यातून...

माळजाई मंदिर परिसरात पशुपक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था; प्रमोद (अण्णा) निंबाळकर यांचा सामाजिक उपक्रमांना पाठिंबा! ...

0
माळजाई मंदिर परिसरात पशुपक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था; प्रमोद (अण्णा) निंबाळकर यांचा सामाजिक उपक्रमांना पाठिंबा!   दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुक्या जीवांसाठी पुढाकार; लायन्स क्लबच्या माध्यमातून भविष्यात व्यापक सहकार्याचे...

डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान...

0
डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ग. कौ. फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण...

0
🌺 मातृदेवता : संघर्ष, त्याग आणि कर्तृत्वाची जिवंत मूर्ती! 🌺 समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या आयुष्याला...

error: Content is protected !!