*फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा*
*दिनांक: 31/10/2026*
*राष्ट्रीय एकता दिनानिमित्त फलटण ग्रामीण पोलीस ठाणे कडून ‘एकता दौड’ चे आयोजन*
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून फलटण ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने आज दिनांक 31/10/2026 रोजी सकाळी ‘एकता दौड’ (Run For Unity) चे आयोजन करण्यात आले होते.
सदर एकता दौडीची सुरुवात पोलीस ठाणे पासून करण्यात आली. यावेळी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ, पोलीस अंमलदार, तसेच अकॅडमी मधील विद्यार्थी, तरुण व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकता, अखंडता व बंधुता टिकवून ठेवण्याची शपथ देण्यात आली. तसेच व्यसनमुक्ती, वाहतूक नियमांचे पालन व कायदा सुव्यवस्था राखणेबाबत जनजागृती करण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस ठाणेच्या अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.
*- फलटण ग्रामीण पोलीस ठाणे*




















