*फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, जि. सातारा*
*दिनांक: 29/10/2026*
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण
*अकस्मात मयत क्र. 119/2026 – कलम 194 BNS*
दि. 29/10/2026 रोजी सायंकाळी 06.15 वा. चे सुमारास मौजे मलवडी, ता. फलटण येथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबतचा प्राथमिक तपशील असा की, फिर्यादी हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असता परत आल्यावर त्यांना मुलगी घरात मृतावस्थेत आढळली. सदर बाबत गावचे पोलीस पाटील यांच्यामार्फत पोलीस ठाण्यास खबर देण्यात आली.
खबर मिळताच सपोनी फलटण ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेची अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय फलटण येथे पाठविण्यात आला आहे.
मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होईल. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हे करीत आहेत.
*- फलटण ग्रामीण पोलीस ठाणे*























