दि.०४|फलटण शहरातील रमेण भोईटे व दिनेश रासने यांच्या घरी यंदा गणेशोत्सवानिमित्त आकर्षक व प्रेरणादायी देखावे साकारण्यात आले. या देखाव्यांनी नागरिकांची विशेष आकर्षण ठरवत भक्तांची मनं जिंकली.

रमण भोईटे यांच्या घरीस्वामी समर्थ महाराज यांचा भव्य देखावा उभारण्यात आला होता.तर दिनेश रासने यांच्या घरी . मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा याची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली होती, या धार्मिक व सांस्कृतिक संगमामुळे गणेशभक्तांना अध्यात्मिक आनंदासह प्रेरणादायी संदेश मिळाला.
या प्रसंगी फलटण कोरेगावचे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी भेट देऊन दर्शन घेतले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, “गणेशोत्सव हा समाजातील एकोप्याचा, श्रद्धेचा व आदर्शांचा उत्सव आहे. अशा उपक्रमांतून समाजात ऐक्य व सकारात्मकतेचा संदेश मिळतो,” असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष भोलेनाथ भोईटे,संपादक प्रशांत सोनवणे, मधुकर खुटाळे सर, शेखर करचे, अनिल करचे, तात्या करचे, अमित साळुंखे, यश घाडगे, अमोल काकडे, उदय भोसले, धनंजय धोंगडे, कैलास सोडमिसे, सनी भोईटे, रुपेश नेरकर, जलील शेख, संतोष दगडे, संतोष भोईटे, सचिन वाघ, सचिन शेळके, अंकुश डबरी, बबन बनकर, विठ्ठल बनकर, मधु बनकर, राहुल कांबळे, अजित पोकळे, राहुल शिंदे, राहुल भुजबळ, सचिन भुजबळ, गणेश ननवरे, अशोक जाधव, प्रशांत शिंदे, हरी रासने, तेजस पवार, सचिन कांबळे, दिपक ढोबरे, निलेश गायकवाड, भटु जाधव, मुदस्सर महात, अक्षय जगताप, इम्तियाज रंगरेज, सागर डोईफोडे, युवराज कागुणे, सुर्याजी जगताप, पप्पू घाडगे, गणेश पवार, प्रतीक दगडे, नारायन रासने, नंदू आंबेकर, राहूल गवरे, माधु पवार, निलेश काकडे, आबिजित शिंदे, निलेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच समर्थ प्रतिष्ठान फलटणचे सचिव गणेश भोईटे यांनीही दर्शन घेत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. या सर्व उपक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, गणेशोत्सव सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जपणूक आणि आध्यात्मिकतेचे सुंदर दर्शन घडवत असल्याचे दिसून आले.


























