Homeताज्या बातम्याअष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल - उपमुख्यमंत्री अजित पवार

अष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

श्री क्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिर परिसर विकास आराखड्यांतर्गत कामांचा आढावा

मुंबई, दि. ११ :- महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांच्या मंदिर परिसरात सुरु असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार पध्दतीने पूर्ण करण्यात यावीत. या विकास आराखड्यांतर्गत काम करताना मंदिरांच्या मूळ आराखड्याला कोणताही धक्का न लावता प्रत्येक कामाला ‘हेरिटेज टच’ द्यावा. श्री अष्टविनायक मंदिर विकास आराखडा भाविकांना दर्जेदार सोयी देण्याबरोबरच महाराष्ट्रातील पर्यटनवाढीसह अर्थव्यवस्थेला नवे बळ देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

श्री अष्टविनायक मंदिर परिसर विकास आराखडा कामांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात झाली. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ राजेश देशमुख, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय, मुंबईचे संचालक तेजस गर्गे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय, पुणेचे सहायक संचालक विलास वाहणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील अष्टविनायकांपैकी मयुरेश्वर (मोरगाव), चिंतामणी गणपती (थेऊर), विघ्नेश्वर (ओझर), महागणपती (रांजणगाव), वरदविनायक (महड), सिद्धिविनायक (सिद्धटेक) आणि बल्लाळेश्वर (पाली) या मंदिरांच्या परिसरात सुरु असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार पध्दतीने करण्यात यावीत. मंदिराच्या मूळ आराखड्याला कोणताही धक्का न लावता काम करण्यात यावे. अष्टविनायक मंदिर परिसरात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना पर्यायी जागा देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे, मंदिर परिसरात अधिक मोकळी जागा उपलब्ध करावी. मूळ मंदिराशी विसंगत ठरणारी परिसरातील बांधकामे काढून टाकून आपत्कालीन स्थितीत मंदिर परिसरात अॅम्ब्युलन्ससह अग्निशमन गाड्या सहज जाऊ शकतील अशी मार्गव्यवस्था ठेवण्यात यावी.

पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्राला प्रचंड संधी असून पर्यटनाची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यावर भर द्यावा. केरळ, ओडिशा यांसारख्या राज्यांच्या धर्तीवर विदेशी पर्यटक, परराज्यातील भाविक आणि नवी पिढीला आकर्षित करण्यासाठी आधुनिक सोयीसुविधा, उच्च दर्जाच्या सेवा व पर्यटनाभिमुख उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘बस आज की रात है जिंदगी’: केतन अग्रवालने कौटुंबिक कार्यक्रमात नाचलेले गाणे आता एक...

7 मे रोजी कार्यक्रमात सादर झालेल्या गायिका रीतू शर्माने कार्यक्रमातील आनंदी वातावरणावर प्रकाश टाकणारा एक मार्मिक व्हिडिओ शेअर केला आहे. पुणे: एकेकाळी कौटुंबिक...

लोहगड किल्ला खून: पोलिसांनी गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले, चेतनच्या चालीचे विश्लेषण; केतन अग्रवालच्या...

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी आरोपी चेतन चौधरी याला लोहगड किल्ल्यावर आणले आणि केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासाचा एक भाग म्हणून चेतनच्या गुन्ह्याच्या...

*संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा* *रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव, तर दिलीप...

संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव, तर दिलीप शिंदे खजिनदार; लायन्स क्लब फलटणची नवी कार्यकारिणी पदस्थ   फलटण, प्रतिनिधी : समर्थ...

नाल्यांमध्ये अडकलेल्या गौरची वन पथकाने सुटका केली

गौर आपल्या कळपापासून विभक्त होऊन शहरी किनाऱ्याजवळ राहिली असावी. अन्न किंवा पाण्याच्या शोधात ते शहरात दाखल झाले असावे पुणे : सिंहगड रोडवरील विश्रांतीनगर...

किरकोळ टेम्पोसह चार वाहनांना धडक, बुक

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर वैदूवाडी येथे मंगळवारी सायंकाळी एका १७ वर्षीय मुलाने पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी चालवत असलेल्या टेम्पोने चार वाहनांना धडक दिली.वानवरी...

error: Content is protected !!