Homeताज्या बातम्याकमला निंबकर बालभवन च्या माजी विद्यार्थ्यांची संस्थेच्या 'आपली शाळा' येथील विद्यार्थ्यांच्या...

कमला निंबकर बालभवन च्या माजी विद्यार्थ्यांची संस्थेच्या ‘आपली शाळा’ येथील विद्यार्थ्यांच्या पौष्टिक खाऊसाठी सढळ हाताने मदत….!

फलटण : कमला निंबकर बालभवनचे माजी विद्यार्थी श्री. संग्राम लिंबाजी राऊत सध्या अमेरिकेत रहिवासी आहेत. त्यांचे आई-वडील दोघेही प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करुन अनेक विद्यार्थी घडवले. श्री.संग्राम लिंबाजी राऊत हे अमेरिकेतील प्रतिथयश व्यावसायिक असून आपल्या आई-वडिलांचा गरजूंना मदत करण्याचा वसा आणि वारसा ते अखंडपणे चालवत आहेत. त्यांनी यापूर्वीही प्रगत शिक्षण संस्थेच्या कमला निंबकर बालभवनमधील उपक्रमांना मदत केली आहे.

ते आवर्जून सांगतात की शाळेने त्यांना भरभरून दिले. मॅक्सिन आजी, मंजुताई, जगदाळे सर आणि सर्वच शिक्षकांनी परीघाबाहेर जाऊन ज्ञानदानाचे कार्य केले. समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच सर्व गुरुवर्यांनी दिला. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन, अखिल मानव जातीविषयीचे प्रेम, व जात-धर्म-पंथविरहित माणूस आणि मानवतेचे नाते हे याच शाळेने जपायला शिकवले. त्यामुळे ते शाळेचे खूप ऋणी आहेत आणि याच भावनेतून जेवढी होईल ती मदत करण्याची त्यांची भूमिका आहे.

ज्या ठिकाणी प्रगत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची सुरुवात झाली त्याच ठिकाणच्या बालवाडीच्या चिमुकल्या मुलांसाठी सकस आहारासाठी मदत श्री. राऊत आज करत आहेत.

‘आपली शाळा’ येथील बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी मिळालेल्या या अर्थसहाय्यातून रोज सकाळी मुले आल्यावर त्यांना सकस नाश्ता दिला जात आहे. सोमवार हरभरा उसळ किंवा मुगाची उसळ, मंगळवार अंडी, बुधवार सफरचंद, केळी किंवा ऋतूनुसार उपलब्ध फळे, गुरुवार राजगिरा लाडू किंवा शेंगदाणे लाडू किंवा चिक्की, शुक्रवार लापशी, उपमा, शिरा, मुगाची खिचडी यापैकी एक असे विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.

बालवाडीच्या मुख्याध्यापिका समीरा कुरेशी यांनी संग्राम राऊत यांना या मदतीबद्दल धन्यवाद दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनीही याबद्दल समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली बंद पडलेल्या साखरवाडी कारखान्याचे एकात्मिक औद्योगिक संकुलात रूपांतर* *९० वर्षांचा वैभवशाली...

0
रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली बंद पडलेल्या साखरवाडी कारखान्याचे एकात्मिक औद्योगिक संकुलात रूपांतर   ९० वर्षांचा वैभवशाली वारसा पुन्हा बहरला; श्री दत्त इंडिया प्रा. लि.च्या आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ...

जि. प. शाळा राजाळा सर्कल (सोनगाव बंगला) च्या विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय बालक्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी...

0
जि. प. शाळा राजाळा सर्कल (सोनगाव बंगला) च्या विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय बालक्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी विजयी खेळाडूंचा शाळा व्यवस्थापन समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या वतीने...

पिसाळच्या सत्कारातून कोळकीत मिनी क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा होणार! खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण...

0
सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळच्या सत्कारातून कोळकीत मिनी क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा होणार! खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि निधी मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार; आमदार सचिन पाटील...

### सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळच्या सत्कारातून कोळकीत मिनी क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा होणार!   ### खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि निधी मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार; आमदार...

*सोमेश्वर कारखान्याच्या निकालाने सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची कसोटी चर्चेत* *अजितदादांच्या निधनानंतर सहकारातील महत्त्वाची...

0
सोमेश्वर कारखान्याच्या निकालाने सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची कसोटी चर्चेत ### अजितदादांच्या निधनानंतर सहकारातील महत्त्वाची निवडणूक; गावोगावी संपर्क आणि आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या मेहनतीचीही चर्चा समर्थ...

error: Content is protected !!