प्रतिनिधी |भाऊसाहेब निकाळजे
फलटण गिरवी | दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी गिरवी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. तेजश्री पाटील (MBBS, B.J. मेडिकल कॉलेज, पुणे) यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या नियुक्ती निमित्त गिरवी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार व स्वागत करण्यात आले. या प्रसंगी ग्रामस्थांनी नव्याने रुजू झालेल्या डॉ. तेजश्री पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी बोलताना डॉ. तेजश्री पाटील यांनी गिरवी ग्रामस्थांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या रुजू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्यसेवा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


























