Homeताज्या बातम्याभारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेतर्फे नवनिर्वाचित महिला अध्यक्षा आयु. रंजना राजकुमार...

भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेतर्फे नवनिर्वाचित महिला अध्यक्षा आयु. रंजना राजकुमार रणवरे यांचा सन्मान

फलटण दि.२२| भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सातारा पूर्व अंतर्गत फलटण तालुका महिला कार्यकारिणीचे गठण महाराष्ट्र राज्य महिला संघटिका व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आयुनी. राजश्रीताई सरावदे, जिल्हाध्यक्षा आयुनी. सुजाता गायकवाड आणि जिल्हा शाखा सातारा पूर्व अध्यक्ष आयु. नानासाहेब मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले.

या निवड प्रक्रियेदरम्यान फलटण तालुका शाखेचे पदाधिकारी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे पार पडलेल्या पूज्य भंते करूणानंद थेरो यांच्या महाथेरो सन्मान व कठीण चिवरदान धम्मसोहळ्यात उपस्थित असल्याने त्या वेळी अनुपस्थित होते. पूर्व सूचना देऊन नियोजित निवड प्रक्रिया झाली असती तर आनंदच झाला असता.पण असो भारतीय बौद्ध महासभा व्यक्ती पेक्षा धम्माला सर्वोच्च स्थानी मानते. त्यामुळे या निवड प्रक्रियेचे आम्ही स्वागत करतो. छ. संभाजी नगर येथील या ऐतिहासिक कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते होते.त्यामुळे फलटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि बौद्ध उपासक – उपासिका यांनी या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला. आणि या धम्म सहलीत सर्वजण सहभागी झाले.

धम्म सहलीहून परतल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित महिला अध्यक्षा आयु. रंजना राजकुमार रणवरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन सन्मान सोहळा आयोजित केला. त्यांना पुष्पगुच्छ, शॉल, धम्मध्वज आणि धम्मपट्टी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नव्या महिला कार्यकारिणीतील सरचिटणीस आयु. रुक्षलाताई भोसले, कोषाध्यक्षा आयु. वृषालीताई झेंडे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील धम्मप्रचार कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अध्यक्ष आयु. महावीर भालेराव यांनी आपले विचार मांडताना सांगितले –“धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबात धम्माचे मूल्य आणि सम्यक विचार रुजतात. रणवरे कुटुंबाचे योगदान चळवळीशी पूर्वीपासून निगडित असून त्यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुका शाखा निश्चितच अधिक सक्षम बनेल. भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने आपल्या संपूर्ण महिला कार्यकारिणीला सहकार्य राहील. तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कार्यकारणीला मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”

राज्य संघटक व पुणे-सातारा प्रभारी, समता सैनिक दल असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांनी सांगितले –“आयु. रंजना रणवरे या धम्मनिष्ठ, समर्पित व कार्यक्षम कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे फलटण तालुक्यात बौद्ध धम्माच्या प्रचार–प्रसाराला नवे बळ मिळेल. रणवरे कुटुंब तन, मन, धनाने चळवळीला सदैव सहकार्य करीत राहील.”

आपल्या सत्काराला उत्तर देताना आयु. रंजना रणवरे म्हणाल्या –“फलटण तालुका महिला शाखेच्या माध्यमातून महिलांना चळवळीतील ‘धम्मदूत’ म्हणून सक्रिय करण्याचा मी संकल्प व्यक्त करते. धम्म, शिक्षण, समता आणि संघटन या चार स्तंभांवर आधारित कार्य अधिक दृढ करण्याचा माझा निर्धार आहे. मी अध्यक्ष झाले असले तरी आपण सर्वजण समान आहोत; एकत्रितपणे धर्माचा प्रचार–प्रसार करूया. माझ्या कुटुंबाचा हेतू कोणत्याही स्वरूपाचा मोठेपणा मिरवणे हा नसून धम्म कार्याला गतिमान करण्याचा विचार आहे. तेव्हा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेची मला मदत निश्चितच त्या दिशेने घेऊन जाण्यासाठी उपयोगी पडेल.”

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती आयु. दादासाहेब भोसले सर(राज्य संघटक व पुणे-सातारा प्रभारी, समता सैनिक दल), आयु. महावीर भालेराव सर(तालुकाध्यक्ष, भा.बौ.म. शाखा फलटण), आयु. बाबासाहेब जगताप सर (महासचिव), आयु. विठ्ठल निकाळजे सर (कोषाध्यक्ष), आयु. रामचंद्र मोरे सर (प्रचार व पर्यटन विभाग उपाध्यक्ष), आयु. बजीरंग गायकवाड सर (संस्कार सचिव), ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण निकाळजे सर, प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे सर, संघटक आयु.आनंद जगताप सर, राजकुमार रणवरे सर, बनसोडे साहेब व रणवरे कुटुंबीय उपस्थित होते.या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका शाखेचे संस्कार सचिव आयु.बजीरंग गायकवाड यांनी केले.

फलटण तालुका शाखेच्या वतीने महिलांना “धम्मदूत” म्हणून सक्रिय करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. महिला कार्यकारिणीच्या माध्यमातून धम्म, शिक्षण, समता आणि संघटन या चार स्तंभांवर आधारित कार्य पुढे नेण्याचा निर्धार भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने या प्रसंगी घेण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तज्ञांनी प्रोबायोटिक्स, आतड्यांवरील उपचारांचा विज्ञान-आधारित वापर करण्याचे आवाहन केले आहे

किण्वन आणि मायक्रोबायोम थेरप्यूटिक्स कॉन्फरन्समधील उपस्थित पुणे : आरोग्यसेवेचे भवितव्य केवळ रोगावर उपचार करण्यामध्ये नाही तर मानवी आतड्यांसंबंधीच्या परिसंस्थेचे सखोल ज्ञान आणि प्रोबायोटिक्सच्या...

लोहगड किल्ला हत्याकांड: केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर ‘प्रेमी’ सिया गोयल-चेतन चौधरी आता एकमेकांकडे बोटे दाखवत...

केतन अग्रवाल (आर), सिया गोयल (सी), चेतन चौधरी (एल) पुणे: पुण्याचे रिअल इस्टेट संचालक केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरून कथितरित्या त्याच्या मृत्यूस ढकलल्यानंतर,...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

प्रेयसीच्या इशाऱ्यावरून आरोपी चौधरीने लोहगड किल्ल्यावर रियाल्टरला ढकलून दिले.

पुणे : अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल हिच्यासोबत रचलेल्या योजनेनुसार 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन...

पावसामुळे वीज खंडित आणि चढ-उतार होतात

पावसामुळे शहरातील अनेक भागात अधूनमधून वीजपुरवठा खंडित झाला पुणे : बुधवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंढव्यात सुमारे चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित...

error: Content is protected !!