निरगुडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून समाजकार्यात सक्रिय असलेले श्री. प्रदीप खुडे हे नाव आज गोरगरिबांच्या हक्कासाठी नेहमीच पुढे असणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते.
शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारे श्री. खुडे यांनी सामाजिक न्याय, समता आणि शिक्षण या मूल्यांचा प्रसार गावोगाव करण्याचे कार्य केले आहे. सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर आधारित त्यांच्या कार्यामुळे निरगुडी परिसरात अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.
गोरगरिबांना मदतीचा हात देणे, सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहणे आणि तरुणांना विधायक कार्यासाठी प्रोत्साहन देणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. अशा या जनतेच्या सेवकाला आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
“आपले आयुष्य निरंतर समाजहिताच्या कार्यासाठी समर्पित राहो,
आणि आपल्या कार्यातून समाजाला नवी दिशा मिळो” — अशा शुभेच्छा श्री. प्रदीप खुडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


























