गावाच्या उज्ज्वल परंपरेचा अभिमान वाढवणारा कार्यक्रम
फलटण | गिरवी गावातील भूमिपुत्रांनी शासकीय सेवेत उल्लेखनीय यश संपादन करून गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. या यशस्वी भूमिपुत्रांचा सत्कार समारंभ गिरवी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित तरुणांचा सन्मान करण्यात आला . श्री.प्रशांत प्रदीप कदम माजी एबीपी माझा न्युज वार्ताहर व संपादक, महेश वसंतराव जाधव रिजनल मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया तासगाव,डॉ. संतोष तुकाराम कदम, पी.एच.डी इतिहास विभाग प्रमुख ,मुधोजी महाविद्यालय, डॉ. संदीप मोहनराव कदम, सहाय्यक प्राध्यापक (कृषी वनस्पतीशास्त्र), राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे,श्री. विनय दिलीपराव कदम, तालुका कृषी अधिकारी (मोहीम अधिकारी), पुणे जिल्हा,कु. सोनाली हनुमंतराव सुतार, मंडल कृषी अधिकारी (गुण नियंत्रण), फलटण तालुका., विशाल नारायण वाघ, बी.एस्सी. ऍग्री — विक्रीकर अधिकारी पदावर नुकतीच निवड.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर शिवराज कदम यांनी केले, तर सूत्रसंचालन भूपेश कदम यांनी केले.
या वेळी गिरवी गावातील सरपंच सौ. वैशाली राजेंद्र कदम, उपसरपंच संतोष मदने, तसेच प्रतिष्ठित नागरिक राजेंद्र कदम, बाळासाहेब (जगदीश) कदम, रामभाऊ कदम, विजय लक्ष्मणराव कदम, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर शिवराज संपतराव कदम, शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्कारमूर्तींनी या सन्मानाबद्दल ग्रामस्थांचे, विशेषतः कार्यक्रमाचे आयोजक श्री राजेंद्र भुजंगराव कदम व भूपेश बबनराव कदम यांचे मनःपूर्वक आभार मानले.गिरवी गावाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीचे प्रतीक ठरलेला हा सन्मान सोहळा दीर्घकाळ स्मरणात राहील.


























