Homeताज्या बातम्या*भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन सोशल ग्रुप, फलटणतर्फे यशोदा गोपालन गोशाळेत चारा दान**...

*भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन सोशल ग्रुप, फलटणतर्फे यशोदा गोपालन गोशाळेत चारा दान** *व फळवाटप* *सेंद्रिय शेती व गौसेवा यांचा संदेश*

भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन सोशल ग्रुप, फलटणतर्फे यशोदा गोपालन गोशाळेत चारा दान व फळवाटप

सेंद्रिय शेती व गौसेवा यांचा संदेश

फलटण :

भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन सोशल ग्रुप, फलटण यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत यशोदा समृद्ध गोपालन, फलटण येथील गोशाळेला चाऱ्याचे दान आणि गाईंना फळांचे वाटप करण्यात आले. महावीरांच्या अहिंसा, करुणा व सर्व जीवांप्रती दयाभाव या संदेशाला अनुसरून हा उपक्रम अतिशय उत्साहात पार पडला.

या प्रसंगी जैन सोशल ग्रुपतर्फे “गाय वाचविण्याचे पुण्य अत्यंत महान आहे आणि गाईची सेवा हीच ईश्वर सेवा” असा संदेश देण्यात आला. तसेच फलटणमध्ये गाईंसाठी मोठ्या प्रमाणावर शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने यशोदा गोशाळेचे विस्तारीकरण करण्याबाबत नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले.

ग्रुप सदस्यांनी सांगितले की, पुढील काळात फलटणमध्ये एकाच छताखाली अधिक गाईंना सुरक्षित निवारा देऊन सेंद्रिय शेती, शेणखत आणि केमिकलमुक्त शेती या संकल्पनांना प्रोत्साहन देण्याचे नियोजन आहे. पर्यावरण, शेती आणि पशुसंवर्धन या तिन्ही क्षेत्रांच्या संवर्धनासाठी गौसेवा अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमाबद्दल यशोदा समृद्ध गोपालन गोशाळेचे संचालक सौरभ सुनील सोनवले यांनी जैन सोशल ग्रुप फलटण यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “समाजातील अशा सकारात्मक उपक्रमांमुळे गोशाळेच्या कार्याला अधिक बळ मिळते व गाईंना आवश्यक सेवा पुरविणे सुलभ होते.”

उपक्रमामुळे परिसरात समाधानाचा भाव पसरला असून महावीर जयंतीचे धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात विदेशी भाज्यांचे दर वाढल्याने निरोगी खाण्याला प्रीमियम मिळतो

उशीर झालेला मान्सून आणि अनियमित पावसामुळे पिकांचे चक्र विस्कळीत झाले आहे आणि उत्पादनात घट झाली आहे ज्यामुळे विदेशी भाज्यांचे दर वाढले आहेत. पुणे...

लोहगड खून प्रकरणाचा ट्विस्ट: कटाची ‘माहिती’ असलेल्या मित्राचा दावा आहे की त्याने चेतन चौधरी...

चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोन आरोपींनी चेतनचा मित्र आणि वर्गमित्र असलेल्या तरुणाशी त्यांच्या कथित योजनेबद्दल चर्चा केल्याचा पोलिसांचा दावा आहे. पुणे:...

*स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी”*

"स्मार्ट मीटर बसविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी" समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, दि. ३ जुलै : राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट...

*पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी*

पोलिस अधीक्षकांकडून पालखी मार्गाची पाहणी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा १५ ते १८ जुलैदरम्यान मार्गक्रमण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस...

पुणे पोलिसांनी केतन अग्रवालच्या हत्येशी संबंधित कपडे जप्त केल्याने सिया गोयलने मधले बोट दाखवले

तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोपी सिया गोयल हिने कथितपणे मधले बोट दाखवले. पुणे : तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या...

error: Content is protected !!