कोंढवे धावडे – दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा… या जयघोषात कोंढवे धावडे परिसर दत्तमयी झाला. सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानाच्या वतीने व सर्व स्वामीभक्तांच्या सहभागातून श्री दत्त जन्मोत्सव सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. महिला भक्तांच्या शुभहस्ते श्री दत्तात्रयांची आरती करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
“नाथांच्या नाथा नमितो तुज माथा… शरण आलो कृपा करा…” अशा भावपूर्ण शब्दांत डॉ. गणेश राऊत यांनी श्रीगुरुचरणी आपली भावना व्यक्त करताना सांगितले, “मागणं काही नाही देवा… फक्त सर्वांच्या पाठीशी उभे राहून सुख–शांती–समाधान द्यावे,” असे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्याचे आयोजन संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत व स्वामीभक्त प्रसाद बोडके यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
कार्यक्रमाला जि.प. सदस्य सौ. अनिताताई तुकाराम इंगळे, उद्योजक तुकाराम तात्या इंगळे, माजी उपसरपंच नवनाथ बापू धावडे, विजय धावडे, विलास ढम, प्रशांत महाजन, बंटी दळवी, श्रीरंग गायकवाड, किरण दगडे तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग व स्वामीभक्त उपस्थित होते.
आनंद, शिस्त व आध्यात्मिकतेच्या वातावरणात दत्त जयंती सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.


























