Homeताज्या बातम्याअनंतराव पवार महाविद्यालयात संविधान जागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

अनंतराव पवार महाविद्यालयात संविधान जागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी| पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट येथे एकदिवसीय ‘संविधान जागृती’ कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची मूलभूत ओळख करून देणे, संविधानाची रचना, उद्देश, प्रस्तावना व महत्त्व स्पष्ट करणे, तसेच मूलभूत हक्क व कर्तव्यांची जाणीव निर्माण करणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

लोकशाही मूल्यांचे संवर्धन, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांची जाणीव वाढवणे, संविधानाबद्दल आदर व निष्ठा निर्माण करणे आणि संविधान हा राष्ट्राचा आधारस्तंभ आहे ही भावना दृढ करण्याच्या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. विजय बालघरे यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अभय पाटील यांनी केले.

या कार्यशाळेत प्रा. सचिन पवार यांनी मार्गदर्शन करताना भारतीय संविधानाचा ऐतिहासिक संदर्भ, निर्मिती प्रक्रिया, उद्दिष्टे, अपेक्षा व महत्त्व यांची सविस्तर माहिती दिली. संविधान हे त्यागाचे फलित असून महापुरुषांच्या विचारांचे मूर्त स्वरूप आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच संविधानातील विविध कलमे, मूलभूत हक्क व अधिकारांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. कृष्णा भांडलकर (राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अभय पाटील, प्रा. दिलीप सोनवणे, प्रा. मीनाली चव्हाण, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे निरीक्षक म्हणून श्री. कृष्णा भांडलकर यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनीही मार्गदर्शन करताना “आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी प्रत्यक्ष संविधान जगत आहेत,” असे गौरवोद्गार काढले.

यावेळी आलिजा शेख (एस.वाय. बी.कॉम), ऋत्विक सातव (एस.वाय. बी.ए.), सोनाली सरोदे (एस.वाय. बी.कॉम), दिव्या बोरसे (एम.एस्सी) व अभिषेक पाटील (एस.वाय. बी.कॉम) यांनी मनोगते व्यक्त केली. प्रा. ईश्वर हेमके यांनीही आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत देशमुख व प्रा. मीनल चव्हाण यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. सिद्धार्थ नवतुरे यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन प्रा. दिलीप सोनवणे यांनी केले. संविधानिक साक्षरता वाढवून जबाबदार व जागरूक नागरिक घडवण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवाळीच्या सुट्टीतही पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ रस्त्यावर; फलटणमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्वतः मैदानात!

0
दिवाळीच्या सुट्टीतही पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ रस्त्यावर; फलटणमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्वतः मैदानात! क्रांतिसिंह नाना पाटील चौकासह एएसयू परिसरातील वाहतूक सुरळीत; पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेचे प्रवाशांकडून...

फलटण ते श्रीक्षेत्र अक्कलकोट भव्य पायी पालखी रथ सोहळ्याचे नियोजन जाहीर! स्वामी समर्थ...

0
फलटण ते श्रीक्षेत्र अक्कलकोट भव्य पायी पालखी रथ सोहळ्याचे नियोजन जाहीर! स्वामी समर्थ सेवा मंडळाचा सातवा वर्षपूर्ती सोहळा; १३ नोव्हेंबरला भक्तिमय वातावरणात पालखीचे प्रस्थान, २५...

लायन्स क्लब व माळजाई मंदिर उद्यान समिती यांचा दिवाळी फराळाच्या निमित्ताने फलटणच्या मान्यवरांचा स्नेहमेळावा;...

0
लायन्स क्लब व माळजाई मंदिर उद्यान समिती यांचा दिवाळी फराळाच्या निमित्ताने फलटणच्या मान्यवरांचा स्नेहमेळावा; स्वच्छता, सौंदर्यीकरण व शहर विकासावर विचारमंथन फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार...

श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मंदिराची आकर्षक पुष्पसजावट; १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय...

0
श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मंदिराची आकर्षक पुष्पसजावट; १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय फलटणकरांचे आकर्षण!   फलटण : प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक फलटण...

फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र! ...

0
फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र! दिवाळी पाडव्यानिमित्त रविवार पेठेतील तालीम चौकात आकर्षक रोषणाई; आकाशकंदील पाहण्यासाठी नागरिकांची मोठी...

error: Content is protected !!