Homeताज्या बातम्याकोल्हापूर सर्किट बेंच इमारतची कामे वेळेत आणि गतीने पुर्ण होतील – पालकमंत्री...

कोल्हापूर सर्किट बेंच इमारतची कामे वेळेत आणि गतीने पुर्ण होतील – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पुढिल तीन दिवसात इमारतीचे हस्तांतरण, पालकमंत्र्यांकडून कामकाजाची पाहणी

कोल्हापूर, दि. ०८| मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला 18 ऑगस्टपासून सुरुवात होत असून, इमारतीची सुरू असलेली कामे वेळेत आणि गतीने पूर्ण होत असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासमोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीमधील प्रस्तावित सर्किट बेंच इमारतीच्या सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, शाखा अभियंता रोहण येडगे, कंत्राटदार अनिकेत जाधव व उदय घोरपडे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे ॲड. इंद्रजित चव्हाण, टी. एस. पाडेकर, व्ही. आर. पाटील, के. व्ही. पाटील, मनोज पाटील, संग्राम देसाई, प्रमोद पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी तिन्ही इमारतींच्या कामांना प्रत्यक्ष भेट देऊन उभारण्यात येणाऱ्या तीन कोर्ट रूम्सची पाहणी केली. यावेळी त्यांनी बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. येत्या 18 ऑगस्टपासून कामांना सुरुवात होणार असल्याने इमारतींचा ताबा न्यायालयाकडे 11 ऑगस्टला देणे आवश्यक असून, याबाबत पुढील तीन दिवसांत इमारत न्यायालयीन कामकाजासाठी हस्तांतरण करण्याचे नियोजन असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले

शाहू महाराजांच्या काळातील व्यवस्थांना सर्किट बेंचच्या माध्यमातून पुन्हा पुनर्जन्म

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील व्यवस्था या सर्किट बेंचच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू होत आहे. कोल्हापूरच्या इतिहासामध्ये अशा अनेक व्यवस्था लोकांना स्थानिक पातळीवर देण्यात आल्या होत्या. सर्किट बेंच कोल्हापूरात सुरू झाल्याने आपल्यासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. येत्या 18 ऑगस्टला हा बेंच प्रत्यक्षात सुरू होताना कोल्हापूरसह शेजारील पाच जिल्ह्यांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर* **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मोदी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार** समर्थ 24 तास...

*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी...

0
*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण **फलटण,...

*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव...

0
*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव च्या वेताळबाबा मंदिरात महाआरती चे नियोजन* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण पासून...

error: Content is protected !!