# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*
**विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**
**दालवडी, प्रतिनिधी :** फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत सगुण माता माध्यमिक विद्यालय, दालवडी येथे विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल, फलटण यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य जपणे, दृष्टीदोष वेळेत ओळखणे आणि नेत्र आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. निंबाळकर सर, दालवडी येथील प्रतिष्ठित समर्थ नायक साप्ताहिक चे कार्यकारी संपादक श्री. शेखर गायकवाड, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलच्या डॉ. सोबिया इनामदार व त्यांचे सर्व सहकारी यांनी नेत्र तपासणीचे काम केले.
वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे. अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना वेळेत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होते.


























