खंडाळा (जि. सातारा) येथे जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी एका तरुणावर लक्ष्य साधून गोळीबार केला. या घटनेत तो तरुण जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
फायरिंग करणारे दोघे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खंडाळा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.


























