Homeताज्या बातम्या*फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! सुवर्णपदक विजेत्या ऋतुजा पिसाळचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर...

*फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! सुवर्णपदक विजेत्या ऋतुजा पिसाळचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून कौतुक*

फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! सुवर्णपदक विजेत्या ऋतुजा पिसाळचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून कौतुक

१४ वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णयश; कोळकीच्या कन्येच्या कामगिरीचा अभिमान

समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क, फलटण

फलटण तालुक्यातील कोळकी गावची कन्या ऋतुजा दादासो पिसाळ हिने भारतीय महिला हॉकी संघाच्या ऐतिहासिक सुवर्णपदकाच्या कामगिरीत महत्त्वपूर्ण योगदान देत फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचा अभिमान व्यक्त करत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ऋतुजाची भेट घेऊन तिचे विशेष अभिनंदन केले.

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने तब्बल १४ वर्षांनंतर सुवर्णपदक मिळविण्याचा मान मिळवला. या यशात ऋतुजा पिसाळ हिचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. ग्रामीण भागातून पुढे येत राष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याचा ठसा उमटवणाऱ्या ऋतुजाने आपल्या जिद्दीने, मेहनतीने आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाने फलटण तालुक्याची मान उंचावली आहे.

ऋतुजाच्या निवासस्थानी भेट देत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तिच्याशी मनमोकळा संवाद साधला. तिच्या सुवर्णमय कामगिरीचे कौतुक करत पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ऋतुजाच्या यशामुळे परिसरातील युवा खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळणार असून, ग्रामीण भागातील मुलीही योग्य संधी, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करू शकतात, हा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

यावेळी पंचायत समिती सभापती कु. शिवांजली भोसले, जिल्हा परिषद सदस्य विष्णू लोखंडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, रणजीतभैय्या भोसले, मंडल अध्यक्ष अमित रणवरे, लक्ष्मणराव सोनवलकर, उदयसिंह निंबाळकर,  पंचायत समिती माजी सदस्य .सचिन रणवरे पिसाळ कुटुंबातील सदस्य तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

ऋतुजाचे हे यश केवळ एका खेळाडूचे यश नसून, संपूर्ण फलटण तालुक्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण आहे. तिच्या पुढील वाटचालीतही अशीच सुवर्णकामगिरी घडो, हीच सदिच्छा!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*श्रीराम कारखाना सुरू होताच राजे गटाचा साखर पेढे वाटून जल्लोष*

0
श्रीराम कारखाना सुरू होताच राजे गटाचा साखर पेढे वाटून जल्लोष   रामराजेंच्या नेतृत्वाला संजीवराजे, चेअरमन-व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाच्या प्रयत्नांची साथ; ७० व्या गळीत हंगामाच्या शुभारंभाने...

*रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली बंद पडलेल्या साखरवाडी कारखान्याचे एकात्मिक औद्योगिक संकुलात रूपांतर* *९० वर्षांचा वैभवशाली...

0
रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली बंद पडलेल्या साखरवाडी कारखान्याचे एकात्मिक औद्योगिक संकुलात रूपांतर   ९० वर्षांचा वैभवशाली वारसा पुन्हा बहरला; श्री दत्त इंडिया प्रा. लि.च्या आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ...

जि. प. शाळा राजाळा सर्कल (सोनगाव बंगला) च्या विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय बालक्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी...

0
जि. प. शाळा राजाळा सर्कल (सोनगाव बंगला) च्या विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय बालक्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी विजयी खेळाडूंचा शाळा व्यवस्थापन समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या वतीने...

पिसाळच्या सत्कारातून कोळकीत मिनी क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा होणार! खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण...

0
सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळच्या सत्कारातून कोळकीत मिनी क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा होणार! खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि निधी मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार; आमदार सचिन पाटील...

### सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळच्या सत्कारातून कोळकीत मिनी क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा होणार!   ### खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि निधी मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार; आमदार...

error: Content is protected !!