Homeताज्या बातम्यादिवाळीच्या सुट्टीतही पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ रस्त्यावर; फलटणमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्वतः...

दिवाळीच्या सुट्टीतही पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ रस्त्यावर; फलटणमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्वतः मैदानात!

क्रांतिसिंह नाना पाटील चौकासह एएसयू परिसरातील वाहतूक सुरळीत; पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेचे प्रवाशांकडून कौतुक

समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क

विभागीय सहसंपाद सातारा.

सुमित काळे

फलटण : दिवाळी सणानिमित्त शहरात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, वाहनांची संख्याही वाढल्याने शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. अशा गर्दीच्या परिस्थितीत फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला.

फलटण शहरातील महत्त्वाचा आणि नेहमीच वाहनांची वर्दळ असणारा क्रांतिसिंह नाना पाटील चौक तसेच एएसयू परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून वाहतुकीचे नियोजन केले. पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे वाहतूक कोंडी दूर होऊन वाहनांची ये-जा पुन्हा सुरळीत झाली.

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बहुतांश शासकीय कार्यालयांमधील कामकाज मर्यादित असताना पोलीस प्रशासन मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सेवेसाठी रस्त्यावर अहोरात्र कार्यरत असल्याचे या निमित्ताने दिसून आले. केवळ आदेश देण्यापुरते मर्यादित न राहता पोलीस निरीक्षकांनी स्वतः मैदानात उतरून परिस्थिती हाताळल्याने त्यांच्या नेतृत्वाची आणि कर्तव्यदक्षतेची प्रचिती आली.

सणासुदीच्या काळात नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, व्यापारी, वाहनचालक आणि प्रवाशांची गैरसोय टाळावी, यासाठी फलटण शहर पोलिसांनी घेतलेल्या पुढाकाराचे नागरिक व प्रवाशांकडून कौतुक होत आहे.

खाकी वर्दी केवळ अधिकाराचे प्रतीक नसून ती जनसेवेची जबाबदारीही आहे, याची प्रचिती पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या कृतीतून आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फलटण ते श्रीक्षेत्र अक्कलकोट भव्य पायी पालखी रथ सोहळ्याचे नियोजन जाहीर! स्वामी समर्थ...

0
फलटण ते श्रीक्षेत्र अक्कलकोट भव्य पायी पालखी रथ सोहळ्याचे नियोजन जाहीर! स्वामी समर्थ सेवा मंडळाचा सातवा वर्षपूर्ती सोहळा; १३ नोव्हेंबरला भक्तिमय वातावरणात पालखीचे प्रस्थान, २५...

लायन्स क्लब व माळजाई मंदिर उद्यान समिती यांचा दिवाळी फराळाच्या निमित्ताने फलटणच्या मान्यवरांचा स्नेहमेळावा;...

0
लायन्स क्लब व माळजाई मंदिर उद्यान समिती यांचा दिवाळी फराळाच्या निमित्ताने फलटणच्या मान्यवरांचा स्नेहमेळावा; स्वच्छता, सौंदर्यीकरण व शहर विकासावर विचारमंथन फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार...

श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मंदिराची आकर्षक पुष्पसजावट; १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय...

0
श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मंदिराची आकर्षक पुष्पसजावट; १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय फलटणकरांचे आकर्षण!   फलटण : प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक फलटण...

फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र! ...

0
फलटणमध्ये श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाचा १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र! दिवाळी पाडव्यानिमित्त रविवार पेठेतील तालीम चौकात आकर्षक रोषणाई; आकाशकंदील पाहण्यासाठी नागरिकांची मोठी...

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्यांचे सांगवी येथे स्वागत

0
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्यांचे सांगवी येथे स्वागत समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील...

error: Content is protected !!