फलटण : शिक्षक संवर्ग बदली प्रक्रिया २०२५ पूर्णता मानव विरहीत होत असताना प्रशासन, शिक्षकांना अपात्र करून बदली प्रक्रियेतून बाहेर काढत आहेत .बदली प्रक्रिया आणि दिव्यांग प्रमाणपत्र व शारीरिक तपासणी या दोन्ही प्रक्रिया पूर्णपणे भिन्न आहेत तरीदेखील तपासणी अहवालाचा वापर करून बदली प्रक्रियेत हस्तक्षेप करणे गैर आहे.
संबंधित प्रकरणे न्यायप्रविष्ठ असताना त्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. दिव्यांग शिक्षकांना प्रशासन एक गुन्हेगार समजून वागणूक देत आहेत.डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार दिव्यांग शिक्षक बोगस आहेत असा कोठेही उल्लेख नाही फलटण येथील दिव्यांग शिक्षक सचिन काकडे सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराचा बळी ठरला आहे असे घणाघाती आरोप भाजपा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माजी खासदार शाहीर अमर साबळे यांनी शिक्षण विभागावर फलटण येथील पत्रकार परिषदेत केले.
या वेळी बोलताना ते म्हणाले जिल्हा परिषद शाळा निरगुडी येथील अतिशय विध्यार्थीप्रिय व हुशार शिक्षक सचिन काकडे प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराचा बळी ठरला यामध्ये सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येत असून एका विभागाने दिलेले प्रमाणपत्र दुसरा विभाग नाकारत आहे म्हणजे एक प्रकारे आरोग्य विभागावर अविश्वास दाखवला जात आहे.
























