Homeताज्या बातम्यानिरगुडी गावात कावीळ साथीचा वाढता प्रादुर्भाव तात्काळ उपाययोजना राबवाव्यात – सामाजिक कार्यकर्ते...

निरगुडी गावात कावीळ साथीचा वाढता प्रादुर्भाव तात्काळ उपाययोजना राबवाव्यात – सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांची प्रशासनाला मागणी

फलटण तालुका | निरगुडी गावात गेल्या महिनाभरापासून कावीळ या साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत असून, गावातील गोरे आळी (महात्मा फुले नगर) परिसरात तब्बल दहा ते बारा रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्याची शंका ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार सचिन पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर आमदार पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देत तात्काळ सर्व शासकीय यंत्रणांना याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले.

गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेची तत्काळ तपासणी करण्यात यावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतीतर्फे पूर्वी दिले जाणारे मेडिक्लोअर पुन्हा सुरू करून प्रत्येक कुटुंबाला वाटप करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. ही मागणी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सादर केल्यानंतर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे.

पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने तपासणीसाठी खंडाळा प्रयोगशाळेत पाठवले असून अहवाल लवकरच मिळणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी संतोष कोंडके यांनी दिली.

या वेळी देवराज गोरे, लहु गोरे, अजित गोरे, अभिजित गोरे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नाही, विरोधाचा इशारा

एमपीसीसी प्रमुख हर्षवर्धन सपकाळ पुणे : एमव्हीए सदस्य आणि शेतकरी कार्यकर्त्यांनी शेततळ्यांच्या दुर्दशेवर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई करून...

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; पाणी साचले, वाहतूक कोंडी शहर ठप्प; पूरग्रस्त भागातून ४९२ कुटुंबांचे...

मुसळधार पावसामुळे पुण्यात पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) मान्सूनपूर्व तयारीमधील उणिवा उघड करत, मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, वाहतूक...

वायू आणि जलप्रदूषणावर एमपीसीबीने बारामती ॲग्रोला पाठवली नोटीस | पुणे बातम्या

पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मंगळवारी राष्ट्रवादीचे (SP) आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो शुगर अँड डिस्टिलरी युनिटला...

भाजप आमदार मुळशी धरणाच्या पाण्याचा शहरासाठी वापर करणार, मंत्री म्हणतात या आठवड्यात बैठक

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाचे बॅकवॉटर पुणे : मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासाठी मिळावे, असा प्रलंबित प्रस्ताव दौंडचे भाजप आमदार राहुल कूल यांनी बुधवारी...

पुणे-मुंबई घाट विभागात भूस्खलनाने प्रभावित झालेल्या तीनपैकी एक रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला

पुणे: ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल दरम्यानच्या भूस्खलनग्रस्त विभागातील तीन रेल्वे मार्गांपैकी एक मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री साफ केल्याने पुणे-मुंबई दरम्यानच्या...

error: Content is protected !!