Homeताज्या बातम्यापराभव सुत्ता' तून यशस्वी जीवनाचे मार्गदर्शन मिळते -प्रा. सोमीनाथ घोरपडे

पराभव सुत्ता’ तून यशस्वी जीवनाचे मार्गदर्शन मिळते -प्रा. सोमीनाथ घोरपडे

फलटण दि.०८|यशस्वी आणि शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी कोणते दुर्गुण टाळावे आणि कोणत्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा, यावर मार्गदर्शन करणारे ‘पराभव सुत्त’ प्रवचन फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द येथे झाले. भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेच्यामार्फत आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील बारावे पुष्प गुंपताना ज्येष्ठ प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे यांनी हे प्रतिपादन केले.

या प्रवचनात सोमीनाथ घोरपडे यांनी ‘पराभव सुत्त’ यामध्ये तथागत भगवान श्रावस्ती येथे जेतवनांत अनाथपिण्डिकाच्या संघारामात राहत होतें तेव्हा रात्र संपत आली असता एक सज्जन व्यक्ती सर्व जेतवन प्रकाशित करुन भगवंताजवळ आली व भगवताला नमस्कार करुन एका बाजूला उभी राहिली. बाजूला उभी राहून ती व्यक्ती भगवंताला पद्यात म्हणाली- आम्ही भगवान गौतमाला विचारण्यासाठी आलो आहोत की पराभव पावणारा पुरुष कोणता?भगवान बुद्धांनी शिष्यांना मानवी जीवनात अधोगतीला नेणाऱ्या १२ प्रमुख कारणांबद्दल मार्गदर्शन केले. या १२ कारणांमध्ये धम्माचा द्वेष करणे, दुर्जनांची संगत करणे, आळशीपणा आणि क्रोध, वृद्ध आई-वडिलांची सेवा न करणे, गरजूंची फसवणूक करणे, स्वतःच सर्व सुख उपभोगणे, अहंकार आणि जातीचा गर्व, व्यसनाधीनता, परस्त्रीगमन, वयोवृद्ध असूनही तरुण स्त्रीशी विवाह करणे, दुर्व्यसनी व्यक्तींना महत्त्वाचे अधिकार देणे आणि अवाजवी हाव बाळगणे यांचा समावेश होतो, असे घोरपडे यांनी सांगितले.

या वेळी बोलताना प्रा.सोमीनाथ घोरपडे म्हणाले, “बुद्धांनी सांगितलेली ही १२ कारणे आजही तेवढीच लागू आहेत. जो माणूस या दुर्गुणांपासून दूर राहून सत्कर्म करतो, तो जीवनात कधीही पराभूत होत नाही.” त्यांनी ‘पराभव सुत्त’मधील प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजावून सांगताना, आजच्या काळात या शिकवणीचा उपयोग कसा करता येईल, यावरही मार्गदर्शन केले.

यावेळी फलटण तालुक्याचे भूषण ॲडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, मुंबई आयु-तुषार मोहिते यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील प्रत्येक गावासाठी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ कुरवली खुर्द गावच्या बौद्ध उपासक उपासिकाना भेट देण्यात आला. त्यासोबत उपस्थितांना तालुका शाखेच्या वतीने संविधान प्रस्ताविकेचे व संस्कार विभागामार्फत सूत्रपठन पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

यावेळी तालुका शाखेचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी भाद्रपद पौर्णिमे धम्मामध्ये असणारे महत्व सांगून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रचार व पर्यटन विभागाचे तालुका शाखेचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे व बजीरंग गायकवाड यांनी केले.

या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव, महासचिव बाबासाहेब जगताप,कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, संस्कार विभागाचे तालुक्याचे उपाध्यक्ष बजीरंग गायकवाड, तालुका संघटक विजय जगताप, जेष्ठ मार्गदर्शक, गायक लक्ष्मण निकाळजे, धम्मप्रसारक संघराज निकाळजे पदाधिकारी आणि गावातील अनेक उपासक-उपासिका उपस्थित होते. या प्रवचनामुळे उपस्थितांना जीवनातील योग्य मार्ग निवडण्यास मदत मिळाली, असे अनेकांनी सांगितले. अशा प्रकारच्या प्रवचनांमुळे समाजात बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार होण्यास मदत होते, असे आयोजकांनी सांगितले.यावेळी संघराज निकाळजे यांच्या कुटुंबीयांनी खीर दान केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतात

0
पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रिट ऑपरेटर्सनी संबंधित सर्व प्राधिकरणांनी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार करेपर्यंत उत्पादन थांबवले आहे, तरीही नागरी संस्थेने वनस्पतींवर कारवाई सुरू ठेवली...

पहिल्या सीबीएसई इयत्ता दहावीच्या दुहेरी परीक्षेत, उत्तीर्णतेचा दर 93.7% पर्यंत वाढला; पुण्याच्या विद्यार्थ्यांनी जोरदार...

0
पुणे/मुंबई: बुधवारी जाहीर झालेल्या CBSE इयत्ता दहावीच्या निकालांमध्ये राष्ट्रीय उत्तीर्णतेच्या टक्केवारीत किरकोळ वाढ होऊन 93.7% झाली, परंतु पुणे विभागाची भक्कम कामगिरी आणि...

पुण्यातील छेडछाडीच्या आरोपांवर इन्फोसिसचे निवेदन; नाशिक टीसीएस प्रकरणानंतर छाननीत वाढ

0
पुणे: आयटी क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिसने बुधवारी त्यांच्या पुण्यातील बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) सुविधेवर कामाच्या ठिकाणी छळवणूक केल्याच्या सोशल मीडियाच्या आरोपांना औपचारिक प्रतिसाद...

1 मार्चपासून राज्यात उष्माघाताचे 15 रुग्ण

0
पुणे: वाढत्या कमाल तापमानामुळे महाराष्ट्रात 1 मार्च ते 13 एप्रिल दरम्यान उष्माघाताची 15 प्रकरणे समोर आली असून, डॉक्टर आणि रहिवासी चिंतेत आहेत.राज्याच्या आरोग्य विभागाच्या...

रावेत येथील रहिवाशांनी जमिनीची खोटी पावती वापरून नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : रावेत पोलिसांनी परिसरातील एका रहिवाशाविरुद्ध आपल्या नातेवाइकांना ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने रावेत परिसरात त्याच्या नातेवाईकांच्या...

error: Content is protected !!