Homeताज्या बातम्या*पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा प्रबोधन मंच ठरतोय परिवर्तनाचा केंद्रबिंदू*

*पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा प्रबोधन मंच ठरतोय परिवर्तनाचा केंद्रबिंदू*

पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा प्रबोधन मंच ठरतोय परिवर्तनाचा केंद्रबिंदू

फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

“माणूस हा निसर्गाशी घट्ट जोडलेला आहे. आपण निसर्गाला देव मानतो, त्यातील प्रत्येक प्राणी, वनस्पती यांची पूजा करतो. जशी माणसात माणुसकी आवश्यक आहे, तशीच झाडांमधली ‘झाडूसकी’ जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हिरवा श्वास देणाऱ्या निसर्गाची आणि झाडांची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे प्रभावी प्रतिपादन वाई परिक्षेत्राचे नियतक्षेत्र वनाधिकारी तथा रानकवी राहुल निकम यांनी केले.

पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशन आयोजित ‘महापुरुषांच्या जयंती’ कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रा. विकास शिंदे यांनी आपल्या भाषणात फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले. “पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा हा मंच खऱ्या अर्थाने प्रबोधन करणारा मंच आहे. येथे सर्व महापुरुषांच्या जयंती एकाच व्यासपीठावर साजऱ्या केल्या जातात, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे. समता, शिक्षण आणि संविधानाचे मूल्य यांची शिकवण या मंचावरून दिली जाते. ही प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्रभर पोहोचावी,” असे ते म्हणाले.

यावेळी रानकवी राहुल निकम यांना ‘साहित्य रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या काव्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर यांनी केले. त्यांनी फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत प्रबोधनाच्या कार्याची दिशा स्पष्ट केली.

या कार्यक्रमास पाडेगाव परिसरातील शेकडो महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सामाजिक ऐक्य, पर्यावरण जागरूकता आणि विचारांची देवाणघेवाण यांचे सुंदर दर्शन घडले.

पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा हा उपक्रम केवळ जयंती साजरी करण्यापुरता मर्यादित न राहता समाजमनात विचारांची पेरणी करणारा ठरत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

‘आमच्याद्वारे नियुक्त नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावात वकील आशुतोष...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

फॅक्टरी फ्लोअर्सपासून फ्रंटलाइन्सपर्यंत, ह्युमनॉइड रोबोट्स ग्राउंड मिळवतात

1920 मध्ये, "रोबोट" या शब्दाची झेक नाटकात पदार्पण झाली; 106 वर्षांनंतर रोबोटने युद्धभूमीवर पदार्पण केले.या जानेवारीत, रशियन सैनिक मानवरहित, सशस्त्र युक्रेनियन रोबोटला आत्मसमर्पण करतानाचे...

केतन अग्रवाल खून प्रकरण: चेतन चौधरी स्कूटरवरून लोहगड किल्ल्यापर्यंत 90 किमी चालला – त्याने...

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतन (एल) यांनी 18 जून रोजी पुण्याहून प्रवासासाठी जाणूनबुजून स्कूटर निवडली कारण त्याला टोल प्लाझा रेकॉर्डवरून कार सापडण्याची भीती होती. पुणे:...

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते

चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

error: Content is protected !!