Homeताज्या बातम्या*फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा खळबळ! फिटनेस प्रमाणपत्राच्या वादातून तरुण डॉक्टराची कथित सुसाइड...

*फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा खळबळ! फिटनेस प्रमाणपत्राच्या वादातून तरुण डॉक्टराची कथित सुसाइड नोट व्हायरल; माजी मंत्र्याच्या पीएवर गंभीर आरोप*

फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा खळबळ! फिटनेस प्रमाणपत्राच्या वादातून तरुण डॉक्टराची कथित सुसाइड नोट व्हायरल; माजी मंत्र्याच्या पीएवर गंभीर आरोप

हातावरही जबाबदाराचे नाव लिहिल्याचा दावा; अधिकृत तक्रार नाही, मात्र व्हायरल नोटमुळे प्रशासनासमोर गंभीर प्रश्न

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण :

फलटण उपजिल्हा रुग्णालयात फिटनेस प्रमाणपत्राच्या वादातून पुन्हा एकदा गंभीर खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील एका तरुण डॉक्टरच्या नावाने लिहिल्याचा दावा करण्यात आलेली कथित सुसाइड नोट आणि हातावर लिहिलेला मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या कथित नोटमध्ये राज्य सरकारमधील एका माजी मंत्र्याच्या पीएने धमकावल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील हा तरुण डॉक्टर गेल्या दोन वर्षांपासून फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहे. बंदूक परवान्यासाठी आवश्यक असलेल्या फिटनेस प्रमाणपत्राच्या संदर्भात झालेल्या वादानंतर संबंधित पीएने अरेरावी केली, वरिष्ठांकडे तक्रार केली आणि बॉडीगार्डमार्फत मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप कथित डायरी नोटमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे नमूद करत योग्य न्याय न मिळाल्यास २९ ऑगस्ट २०२६ रोजी आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख या कथित नोटमध्ये आहे.

याचबरोबर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रात संबंधित डॉक्टरने आपल्या हातावर संशयास्पद मृत्यू झाल्यास जबाबदार व्यक्तीचे नाव लिहिल्याचा दावाही करण्यात आला आहे. या दोन्ही गोष्टींमुळे रुग्णालयातील वातावरण ढवळून निघाले असून प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यापूर्वीही फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने कथित मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या प्रकरणातही फिटनेस प्रमाणपत्राच्या कामातून होणाऱ्या दबावाचा उल्लेख करण्यात आला होता. ते प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याची चर्चा या नव्या घटनेनंतर सुरू झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय किंवा पोलिसांकडूनही कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित सुसाइड नोटची सत्यता आणि त्यातील आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. अधिकृत चौकशीनंतरच या प्रकरणातील सत्य स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर* **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मोदी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार** समर्थ 24 तास...

*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी...

0
*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण **फलटण,...

*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव...

0
*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव च्या वेताळबाबा मंदिरात महाआरती चे नियोजन* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण पासून...

error: Content is protected !!