Homeताज्या बातम्याबरड येथे महिला सुरक्षा व जाणीव जागृती कार्यक्रम उत्साहात

बरड येथे महिला सुरक्षा व जाणीव जागृती कार्यक्रम उत्साहात

बरड | प्रतिनिधी दि. २३ डिसेंबर रोजी फलटण तालुक्यातील बरड (लोंढेवस्ती–झिरपवस्ती) येथे महिला सुरक्षा व जाणीव जागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसून समाजाच्या मानसिकतेत बदल होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते अशोक भोसले यांनी केले.

नवयान संशोधन उन्नती आणि शिक्षण-प्रशिक्षण संस्था, बरड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात परिसरातील महिला व युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमादरम्यान महिलांवरील अत्याचार, त्याविरोधातील कायदे तसेच महिलांचे मूलभूत हक्क याबाबत सखोल व मार्गदर्शक माहिती देण्यात आली.

यावेळी वक्त्यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा तसेच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरोधातील कायदे यांची सविस्तर माहिती दिली. महिलांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवून अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महिला व युवती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत, यावर विशेष भर देत बचत गटांच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचा योग्य वापर करून मुलांना चांगले व उच्च शिक्षण द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच स्त्री–पुरुष समानतेविषयी मार्गदर्शन करताना कुटुंबात पुरुष जितका महत्त्वाचा घटक आहे, तितकीच स्त्रीही महत्त्वाची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्त्रीने मानसिक गुलामगिरी झुगारून दिल्यास संपूर्ण कुटुंबाचा कायापालट होण्यास वेळ लागत नाही. घरातूनच अपशब्दांचा वापर बंद करून सामाजिक सुसंस्कार रुजवले पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी अश्विनी अहिवळे यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी गावोगावी सर्व जाती-धर्मातील महिलांच्या सामाजिक संघटना निर्माण होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासाठी नवयान संशोधन उन्नती आणि शिक्षण-प्रशिक्षण संस्थेने पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष हनुमंत भानुदास लोंढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव राजश्री लोंढे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटण पालिकेतील कर घोटाळा उघड! ऑनलाईन करप्रणालीत** *फेरफार करून* *लाखोंचा अपहार*; *नगराध्यक्ष...

फलटण पालिकेतील कर घोटाळा उघड! ऑनलाईन करप्रणालीत फेरफार करून लाखोंचा अपहार;   नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा मोठा खुलासा   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण     महानेट सॉफ्टवेअरमधील कथित छेडछाड,...

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याची मंगेतर आणि तिचा कथित प्रियकर तुरुंगात आहेत....

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

error: Content is protected !!