Homeताज्या बातम्याबारामतीतील शिक्षक घेत आहेत नवतंत्रज्ञानाचे अत्याधुनिक प्रशिक्षण

बारामतीतील शिक्षक घेत आहेत नवतंत्रज्ञानाचे अत्याधुनिक प्रशिक्षण

तब्बल 1000 शिक्षकांनी घेतले प्रशिक्षण 

महाराष्ट्र शासन आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा उपक्रम

दि.३०|  बारामती तालुक्यातील तब्बल १००० शिक्षकांनी अत्याधुनिक नवतंत्रज्ञान आणि शिक्षण पद्धतींचे प्रशिक्षण घेतले. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्यावतीने बारामती येथील सायन्स सेंटर मध्ये २८ जून २०२५ रोजी कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स, व्हर्च्युअल रियालिटी अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध लॅबचे उद् घाटन झाले. या लॅबमुळे पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अशा तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी एक संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. याच उपक्रमात १००० शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे आयोगाने निश्चित केले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी या उद्घाटन कार्यक्रमात शालेय शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे बारामती गटशिक्षणाधिकारी श्री. अनिल गवळी यांनी सर्व शाळांना आपापले शिक्षक सहभागी करण्याविषयी सूचित केले. यानुसार शालेय शिक्षकांना असे तंत्रज्ञान अंगीकारून अध्यापनात योग्य ते बदल घडवून आणण्यासाठी सदर प्रशिक्षण कार्यक्रम शारदानगर येथे २ ऑगस्ट २०२५ पासून सुरु करण्यात आला. नुकताच या प्रशिक्षण कार्यक्रमाचा सांगता कार्यक्रम शारदानगर येथे पार पडला.या सांगता कार्यक्रमासाठी राजीव गांधी आयोगाचे श्री. नरेंद्र शहा, श्री. अनिल मानेकर, श्री. ए. व्ही. सप्रे, श्री. एच. व्ही. मालंडकर, श्री. दिनेश जगताप, श्री. पराग दुपारे उपस्थित होते. बारामती येथील १००० शिक्षकांच्या यशस्वी प्रशिक्षणानंतर पुढील टप्प्यात ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध ५००० शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असून पुढील टप्पा लवकरच सुरु होणार असल्याचे राजीव गांधी आयोगाचे सचिव श्री. नरेंद्र शहा यांनी सांगितले.

या प्रशिक्षणात शिक्षकांनी कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स, डिझाईन थिंकिंग, अत्याधुनिक विदेशी शिक्षणपद्धती, मेंदू आधारित शिक्षणपद्धती यांचे शास्त्रशुध्द पद्धतीने प्रशिक्षण घेतले. केवळ आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षणपद्धती समजून घेणे एवढाच या प्रशिक्षणाचा उद्देश नसून अशा तंत्रज्ञानाचा वापर अभ्यासक्रम शिकवताना अभ्यासातील संकल्पना स्पष्ट करणे आणि त्या संकल्पनांचा नियमित अध्यापनात वापर करणे हा आहे.

प्रशिक्षणात सहभागी शिक्षकांनी प्रशिक्षणातील उपक्रम आणि अध्यापन पद्धती शाळेत वापरण्याचा मनोदय व्यक्त करताना सदर विद्यार्थ्यांना या पद्धतींचा फायदा होईल तसेच या अध्यापन पद्धतींमुळे आम्ही समृद्ध झाल्याची भावना व्यक्त केली. अशी माहिती सेंटरच्या व्यवस्थापक सौ. हीना भाटीया यांनी दिली.

या कार्यशाळेसाठी संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र पवार आणि विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक, सीबीएसई शाळेतील सर्व शिक्षकांनी आणि सायन्स सेंटरच्या स्टाफने सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले

पुणेमराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांना दिलेली आश्वासने पाळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत मंगळवारी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय...

जुन्नर वनविभागाला 2 नवीन बिबट्या बचाव केंद्रे

गेल्या काही वर्षांपासून जुन्नरचा उसाचा पट्टा बिबट्यांचा सुरक्षित अधिवास बनला आहे पुणे: केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने (CZA), जुन्नर वनविभागातील मानव-प्राणी संघर्ष कमी करण्याच्या उपायांचा...

घरगुती एलपीजीच्या किमती पुन्हा वाढल्याने रहिवाशांना बजेटचा सामना करावा लागत आहे

पुणे शहरात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत आता 944.50 रुपये आहे पुणे : हांडेवाडीचे रहिवासी प्रतीक मुणगेकर आणि त्यांच्या पत्नीने वाढत्या इंधन आणि स्वयंपाकाच्या...

पाईप गॅस घोटाळ्यात बिल्डरची २.५५ लाखांची ऑनलाइन फसवणूक

पुणे : पाइप्ड गॅस कंपनीचे अधिकारी म्हणून भासवणाऱ्या ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी, बिल्डरने पाइप्ड गॅसची थकबाकी भरली नाही, असे सांगून शहरातील बिल्डरची २.५५...

इंद्रायणी पूररेषेच्या आत पुण्यातील मोई फाटा येथे एनजीटी पॅनेलने 20 बंगल्यांना झेंडा दाखवला; पाडण्याची...

चिखली येथील घटनास्थळापासून मोई फाटा परिसर सुमारे 2.5 किमी अंतरावर आहे (चित्रात) जेथे PCMC ने मे 2025 मध्ये इंद्रायणी नदीच्या पूररेषेत बांधलेले 36...

error: Content is protected !!