मुंबई : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी जोरदार आवाज उठविण्यात आला. बांधकाम कामगारांना न्याय मिळावा, शासनाने प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा आणि कामगार कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
बांधकाम कामगारांच्या प्रमुख मागण्या
या आंदोलनाच्या माध्यमातून पुढील मागण्या शासनासमोर मांडण्यात आल्या आहेत.
१. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान तातडीने देण्यात यावे.
२. मागील काळापासून प्रलंबित असलेले सुमारे ३० लाख अर्ज मंजूर करून त्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.
३. दि. १३ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाने जारी केलेले कामगारविरोधी असल्याचा आरोप असलेले तीन शासन निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे सर्व कल्याणकारी योजना सुरू कराव्यात.
४. बंद असलेली बांधकाम कामगारांची ऑनलाइन प्रणाली तातडीने सुरू करून नोंदणी, नूतनीकरण आणि लाभवाटपाची प्रक्रिया सुरळीत करावी.
५. पूर्वीच्या सर्व कल्याणकारी योजनांचा समावेश करून पात्र कामगारांना नोंदणीपासून विविध लाभ मिळण्याची प्रक्रिया सुलभ करावी.
आंदोलनाला आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन
बांधकाम कामगारांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या बेमुदत आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कामगारांच्या न्याय्य मागण्यांना यश मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, कामगार संघटना आणि हितचिंतकांनी आर्थिक पाठबळ देऊन आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
कामगारांच्या प्रश्नांवर शासनाने लक्ष द्यावे
बांधकाम कामगार हा राज्याच्या विकासातील महत्त्वाचा घटक असून, त्याच्या कष्टाला आणि योगदानाला न्याय मिळणे आवश्यक आहे. नोंदणी, नूतनीकरण, प्रलंबित अर्ज आणि कल्याणकारी योजनांशी संबंधित प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी आंदोलनकर्त्यांनी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली आहे.
आंदोलनातील प्रमुख सहभागी कार्यकर्ते : कॉम्रेड शंकर पुजारी, श्री. हिंदुराव गायकवाड, अमोल झेंडे राजकुमार सुतार संजय कुमार निकाळजे, राजेंद्र दिवटे, गणेश बाहुळ, रणजीत देशमुख, मितीन नागरगिदे शरद झेंडे यांच्यासह
संजय अब्दागिरे निखिल कचरे अमित गायकवाड सोमनाथ शिंदे उपस्थित होते
कामगार एकजूट जिंदाबाद! बांधकाम कामगारांच्या न्याय्य हक्कांचा विजय असो!


























