Homeताज्या बातम्याबारामती तालुक्यात अवघ्या तीन दिवसात पुरग्रस्तांना २७ लाखाहून अधिक रुपयांची मदत

बारामती तालुक्यात अवघ्या तीन दिवसात पुरग्रस्तांना २७ लाखाहून अधिक रुपयांची मदत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन

राजनंदिनी आणि राजवीर यांनी खाऊच्या पैशातून केली पूरग्रस्तांना मदत

बारामती, दि. २९ : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे २६ ते २८ सप्टेंबर या तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर असताना राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले असता विविध संस्था, नागरिकांकडून सामाजिक बांधिलकी जपत अवघ्या तीन दिवसात २७ लाख ५२ हजार ३०० रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत केली, याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना १५ लाख रुपये, नवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, करंजे २ लाख ५० हजार, अक्षय शिंदे फाऊंडेशन २ लाख, बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ १ एक लाख, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती १ एक लाख, शंकर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था १ एक लाख, संदीप जगताप आणि भारत गावडे यांनी प्रत्येकी १ एक लाख, बारामती सराफ असोसिएशन ७५ हजार, पंकज निलाखे यांनी ५१ हजार, श्रीपाल नागरी पतसंस्था ५१ हजार, बारामती तालुका मराठा सेवा संघ २५ हजार, नितीन आटोळे २५ हजार रुपये, बारामती तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन २१ हजार, अजयश्री बिगर ग्रामीण सहकारी पतसंस्था, मुरुम २१ हजार रुपये, बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना ११ हजार, छत्रपती शिवाजी महाराज विकास सोसायटी १० हजार, सुनील राजेभोसले १० हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

आम्हाला नाही तर आमच्या शेतकरी बांधवांना खाऊची गरज

करंजेपुल येथे राजनंदिनी आणि राजवीर मालेगावकर यांनी आम्हाला नाही तर आमच्या शेतकरी बांधवांना खाऊची गरज असल्याची भावना व्यक्त करत आपल्या खाऊचे जमा केलेले २ हजार ३०० रुपये रोख रक्कम पुरग्रस्तांना मदत म्हणून दिली. त्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करुन कौतुक केले

राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून या संकटकाळात राज्य शासनाच्यावतीने नागरिकांना धीर देत त्यांचे जीवनमान पूर्वपदावर आण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, सामाजिक संस्था पुढे येऊन सढळ हाताने मदत करीत आहे, संकटाच्याकाळात एकमेकांना मदत करणे ही आपल्या राज्याची परंपरा व संस्कृती आहे. आगामी काळातही पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करावी, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई...

0
सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी फलटण, प्रतिनिधी : सांगवी येथे...

जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास...

0
जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास मनाई; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण २४ ते...

मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान

0
मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क मुधोजी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. ललित...

दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री केल्यास कारवाईचा इशारा! फलटण तहसील कार्यालयाचा इशारा; सुरक्षित आणि...

0
📰 दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री केल्यास कारवाईचा इशारा! फलटण तहसील कार्यालयाचा इशारा; सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज...

बांधकाम कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू! २१ ऑक्टोबर २०२६...

0
मुंबई : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी या...

error: Content is protected !!