Homeताज्या बातम्यायुवा नेते रमेश उबाळे यांची रिपब्लिकन सेनेत महाराष्ट्र नेतेपदी निवड

युवा नेते रमेश उबाळे यांची रिपब्लिकन सेनेत महाराष्ट्र नेतेपदी निवड

मुंबई | प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात सामाजिक व राजकीय कार्याचा भक्कम ठसा उमटवणारे युवा नेते श्री. रमेश अनिल उबाळे यांनी आज मुंबईतील पक्ष कार्यालयात रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला. रिपब्लिकन सेनेचे सेनाप्रमुख आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते झालेल्या या प्रवेश सोहळ्यात श्री. उबाळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची थेट महाराष्ट्र नेतेपदी निवड करण्यात आली.

दादर येथील आंबेडकर भवन येथे जवळपास दीड तास सुरू असलेल्या बैठकीत फुले-शाहू-आंबेडकर चळवळ, पश्चिम महाराष्ट्रातील भूमिका, तसेच सातारा जिल्ह्याचे योगदान या विषयांवर सखोल चर्चा झाली.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक पक्षांनी उबाळे यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र आंबेडकरी विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि सत्तेच्या समीकरणांच्या दृष्टीने रिपब्लिकन सेना हा योग्य पर्याय असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला, असे यावेळी सांगण्यात आले.

या प्रवेश सोहळ्यात रिपब्लिकन सेना पक्षप्रमुख आनंदराज आंबेडकर, प्रदेश महासचिव विनोद काळे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष अमोल रोकडे, अॅड. अमन आनंदराज आंबेडकर यांच्यासह सातारा जिल्हाध्यक्ष विशाल भोसले, जिल्हा महासचिव नितीन रोकडे, युवा नेते जमीर भोसले, राहुल गायकवाड, सचिन कांबळे, संदीप शेरे, मुस्ताक शेख, प्रमोद कांबळे, अमोल झिंब्रे, सुधाकर देवकांत, विकास साठे, दिपक आवळे, गणेश मोहिते, प्रभाकर जाधव, सुधीर वायदंडे यांसह सातारा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती आणि संविधान प्रत देऊन श्री. उबाळे यांनी पक्षनेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

सातारा जिल्ह्यात रिपब्लिकन सेना व शिवसेना संयुक्तरीत्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभाग नोंदवतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच लवकरच शिवशक्ती–भीमशक्तीतर्फे संयुक्त मेळावा घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट आणि पर्यटनवाढीसाठी विशेष उपक्रम राबविण्याची माहितीही देण्यात आली.

महायुतीतील शिवसेनेसोबत युती असल्याने रिपब्लिकन सेनेला सन्मानाची वागणूक मिळत असून आगामी काळात सातारा जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पोलिसांनी केतन अग्रवालच्या हत्येशी संबंधित कपडे जप्त केल्याने सिया गोयलने मधले बोट दाखवले

तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोपी सिया गोयल हिने कथितपणे मधले बोट दाखवले. पुणे : तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या...

राज्यात केवळ १.२८ लाख, ३.१२ कोटी नाही, भू सर्वेक्षण प्रकरणे प्रलंबित, बावनकुळे म्हणतात

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुणे : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले की, महाराष्ट्रात १.२८ लाख भू सर्वेक्षण प्रकरणे...

सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाची खंडणी केल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटक

पुणे : आळंदी-पुणे रोडवरील दिघी येथे सापळा रचून खासगी सुरक्षा एजन्सीच्या मालकाकडून तीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने मंगळवारी एका...

साक्षीदार नाही, पण सुगावाचा माग: केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांनी एकत्र नांगी; पॉलीग्राफ चाचणी,...

रिया गोयल (आर) आणि तिचा कथित प्रियकर, चेतन चौधरी (एल), रिअल्टर केतन अग्रवाल (एम) च्या कथित हत्येप्रकरणी पॉलीग्राफ आणि चाल विश्लेषण चाचण्यांना सामोरे...

ऑनलाइन शेअर फसवणुकीत कात्रज दुकानदाराचे ६४ लाखांचे नुकसान

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगद्वारे जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी कात्रज येथील एका ५३ वर्षीय दुकानदाराची ६३.८५ लाख रुपयांची...

error: Content is protected !!