लायन्स क्लब ऑफ फलटणतर्फे दिवाळीनिमित्त रुग्णालयातील कर्मचारी व लायन्स नागरी पतसंस्था कर्मचारी व माळजाई मंदिर व उद्यान समिती कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ किटचे वाटप…
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण
लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली सणाचे औचित्य साधून लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचे कार्य तत्परतेने व प्रामाणिकपणे करणारे सर्व कर्मचारी हॉस्पिटल स्टाफ तसेच लायन्स नागरी पतसंस्था मर्यादित सर्व कार्यक्षम स्टाफ आणि माळजाई मंदिर व उद्यान परिसर कर्मचारी यांना दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात आले.
लायन्स क्लब परिवाराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत वर्षभर विविध सामाजिक, आरोग्यविषयक व सेवाभावी उपक्रम राबविले जातात. याच भावनेतून हॉस्पिटलमधील रुग्णसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असणारे कर्मचारी तसेच माळजाई मंदिर परिसराची स्वच्छता व देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा, त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येतो.

लायन्स क्लब ऑफ फलटण
सेवा हीच आमची ओळख!

























