Homeताज्या बातम्याविद्यार्थी प्रवेश दिन मोठ्या उत्साहात साजरा श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे...

विद्यार्थी प्रवेश दिन मोठ्या उत्साहात साजरा श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे कार्यक्रमाचे आयोजन

सातारा दि.०८| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या दिवशो शाळेत प्रवेश घेतला त्या दिवसाच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘विद्यार्थी प्रवेश दिन’ श्री. छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सुनिल जाधव, प्रज्ञेश वाघमारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, महिला व बालकल्याण अधिकारी नागेश ठोंबरे, गटशिक्षणाधिकारी रविंद्र खेदारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण-प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथील बनसोडे आणि अमोल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. अनिस नायकवडी यांनी प्रतापसिंह हायस्कूलचा ऐतिहासिक वारसा आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. बार्टी संस्थेचे विभाग प्रमुख वनन जोगदंड यांनी “काय शिकला तू भिमा” या कवितेद्वारे डॉ. आंबेडकर यांचे विचार मांडले.

राहुल गावडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची ओळख करून त्यांचा विकास करण्याचे आवाहन केले. प्रमुख वक्ते अमोल भोसले यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग कथित करत वाचन आणि संस्कार यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.प्रास्ताविक मुख्याध्यापक सन्मती देशमाने यांनी केले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देत शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.कार्यक्रमाच्या शेवटी समता दल अधिकारी व सर्व उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

कार्यक्रमाचे आभार शिक्षिका अस्मिता कदम यांनी मानले, तर सूत्रसंचालन शिक्षिका जयंमाला चव्हाण यांनी केले.कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*वैखरीचा राजा, कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले : विचारांचा तेजस्वी दीपस्तंभ* *मा. नायब तहसीलदार ....

वैखरीचा राजा, कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले : विचारांचा तेजस्वी दीपस्तंभ मा. नायब तहसीलदार . नंदकुमार भोईटे समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या वैचारिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विश्वात...

वैखरीचा राजा, कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले : विचारांचा तेजस्वी दीपस्तंभ मा. नायब तहसीलदार . नंदकुमार भोईटे समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण महाराष्ट्राच्या वैचारिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक...

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

‘आमच्याद्वारे नियुक्त नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावात वकील आशुतोष...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

error: Content is protected !!