*सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून विकासाचे राजकारण पुढे नेऊ : उपसभापती अमोल सस्ते*
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्
फलटण
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर व राजे गटातील सर्व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या विकासाचा राजकारण कायम चालू ठेवलं जाईल. सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून राजे गटाने आजपर्यंत काम केले आहे ते मी पुढे घेऊन जाईन असे आश्वासन फलटण पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती अमोल सस्ते यांनी पदभार स्वीकारताना दिले
यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना निंबाळकर , फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरआप्पा माडकर ,जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर , सह्याद्रीभैय्या कदम , वैशाली कांबळे ,रूपाली सरगर , ज्योती मोरे यांच्यासह पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
फलटण पंचायत समितीत शिवसेनेचा उपसभापती प्रथमच निवडला गेल्याने उपसभापती यांचा पदग्रहण सोहळ्यास शिवसेनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते नाट्यमय रित्या सभापती पदी कु शिवांजली भोसले यांची निवड झाल्यावर राजे गट व शिवसेनेचे अमोल सस्ते यांची उपसभापती पदी निवड झाल्याने तालुक्यातील राजकीय जाणकारांनी आश्चर्य व्यक्त केले होते


























