Homeताज्या बातम्यासर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध;...

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध; दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

खटाव (प्रतिनिधी) दि.०९ | भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड व निंदनीय हल्ल्याचा तीव्र निषेध करत खटाव तालुक्यातील संविधानप्रेमी नागरिक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर केले.

या निवेदनाद्वारे न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीवर झालेला हा हल्ला म्हणजे देशाच्या लोकशाही व संविधानावरच थेट हल्ला असल्याचे नमूद करण्यात आले. लोकशाही मूल्यांना धोका पोहोचवणाऱ्या अशा घटनांची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन, या हल्ल्याची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी वंचित बहुजन आघाडी खटाव तालुका नेते व खादी ग्रामोद्योग मंडळ संचालक मा. गणेश भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश नेत्या गौतमी मसणे, मार्केट कमिटी संचालक शैलेंद्र वाघमारे, अॅड. शुभम नलवडे, पँथर ग्रुप अध्यक्ष भगवान मोरे, गणेश यादव, रामचंद्र निकाळजे, सुनिल मिसाळ, जयपाल डावरे, जितेंद्र डावरे, मोहन नलवडे, विठ्ठल नलवडे, युवराज रणदिवे, तुकाराम बनसोडे, संभाजी बनसोडे, सुर्यकांत बनसोडे, मारुती चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा आधारस्तंभ असल्याने तिच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या कृतींविरुद्ध समाजातील प्रत्येक नागरिकाने आवाज उठवणे ही काळाची गरज असल्याचे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले.

प्रशासनाकडून या घटनेतील आरोपींवर तात्काळ कडक कारवाई न झाल्यास संविधानप्रेमी कार्यकर्ते तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘हे कलियुग आहे’: २००६ च्या खून खटल्यातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर पवनराजे...

खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी 2006 मध्ये वडील माजी मंत्री पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयाने पद्मसिंह पाटील आणि इतर सात जणांची निर्दोष...

बेकायदेशीर डंपिंगसाठी पीएमसीने दोन वर्षांत 1,000 हून अधिक उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावला

मुठा नदीपात्रात कचरा पुणे : नागरी संस्थेने, गेल्या दोन वर्षात, नाले, मोकळे भूखंड आणि नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे बांधकाम आणि विघटन कचरा टाकल्याबद्दल 1,170...

स्वच्छता आणि सुरक्षिततेवर विशेष लक्ष केंद्रित करून आळंदी वारीसाठी सज्ज झाली आहे

पुणे : 8 जुलै रोजी होणाऱ्या वार्षिक संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मिरवणुकीसाठी हजारो वारकऱ्यांना सुरक्षित आणि निर्विघ्न यात्रेची खात्री करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने...

मुलाची डायरी स्त्रीला विचित्र प्रेम, एकटेपणा आणि सामाजिक कलंक यांचा सामना करण्यास भाग पाडते

एक माधव बाग या नाटकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्री सुहिता थत्ते यांनी आज तालीम केली. पुणे : 50 मिनिटांचा एकपात्री नाटक एक माधव...

सेनेच्या (यूबीटी) 6 खासदारांशी वर्षभर चर्चा सुरू, काही आमदारही पक्ष बदलू शकतात: मावळचे खासदार...

शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे पुणे : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी दावा केला की उद्धव ठाकरे...

error: Content is protected !!