Homeताज्या बातम्याश्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

ब्रेकिंग न्यूज
श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागतदर्जेदार शिक्षण समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे विखे पाटील म्हणालेहिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन*उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. नवीन शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना या शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी गुलाबपुष्प आणि पाठ्यपुस्तके देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला**फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. *सातारा जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाई जोमात; फलटणचे गुटखा तस्कर कोमात*’मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका आता ‘मराठी वारसा’ युट्यूब चॅनेलवर**फलटण शहरात १८ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ* *फलटण :*नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत समारंभ संपन्न*फलटण नगरपरिषद शाळा क्रमांक ५ व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा क्र 2 पाच बत्ती चौक या शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; मोफत पाठ्यपुस्तक व शैक्षणिक साहित्याचे वाटप*

श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

फलटण, समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर, विद्यानगर, फलटण येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे अतिशय उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेत दाखल झालेल्या चिमुकल्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात मंगलमय वातावरणात व्हावी या उद्देशाने शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी शाळेच्या परिसरात आकर्षक सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता. नवागत विद्यार्थ्यांनी पालक व शिक्षकांसमवेत या सेल्फी पॉइंटवर छायाचित्रे काढून या अविस्मरणीय क्षणांची नोंद केली.

विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच चिमुकल्यांना खाऊ देऊन त्यांच्या शालेय जीवनाची गोड सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी आणि त्यांचा पहिल्या दिवसाचा ताण कमी व्हावा यासाठी विविध मनोरंजक खेळ, गाणी आणि उपक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमास स्कूल कमिटी सदस्या सौ. नुतन शिंदे, बी.आर.सी. प्रतिनिधी सौ. कुंभार मॅडम, जगताप मॅडम व त्यांचे सहकारी, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. प्रियंका लोंढे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी सौ. कुंभार मॅडम यांनी मुलांना विविध विनोदी चुटके आणि मनोरंजक गोष्टी सांगून त्यांचे भरभरून मनोरंजन केले. त्यांच्या संवादातून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुलांनी टाळ्यांच्या गजरात या कार्यक्रमाचा आनंद लुटला.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. नवागत विद्यार्थ्यांना शाळेची गोड ओळख करून देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या स्वागत समारंभामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेविषयीची भीती दूर होऊन शाळेबद्दल प्रेम, आपुलकी आणि उत्सुकता निर्माण झाली. पालकांनीही शाळेने केलेल्या स्वागत उपक्रमांचे कौतुक केले. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने झाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रेरणादायी वातावरण लाभल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

“शाळेचा पहिला दिवस आनंदाचा, शिक्षणाचा आणि नव्या स्वप्नांच्या सुरुवातीचा ठरला,” अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी यावेळी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दर्जेदार शिक्षण समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले

मिलिंद जोशी यांनी संपादित केलेल्या आणि शिवाजीराव कदम यांना समर्पित 'अमृतसंचय' या स्मरणीय खंडाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुणे : राज्याचे जलसंपदा...

हिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

हिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण पुणे .येथील सावरकर अध्यापन केंद्रात डॉ. अर्जुन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिमालयातील दुर्गम भागात...

*उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि...

मुधोजी हायस्कूलमध्ये रंगला नवागतांचा स्वागत सोहळा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण   उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजला आणि पुन्हा...

*फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन शैक्षणिक...

शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप उत्साहात समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण, दि.१५/०६/२०२६ : फलटण नगरपरिषद शाळा क्र. 3, मंगळवार पेठ फलटण येथे नवीन...

सातारा जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाई जोमात; फलटणचे गुटखा तस्कर कोमात

सातारा जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाई जोमात; फलटणचे गुटखा तस्कर कोमात समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान, मात्र कारवाईत सातत्य राखण्याचे प्रशासनासमोर आव्हान प्रशासनाच्या ;...

error: Content is protected !!