Homeताज्या बातम्यासातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची 'व्हाट्सॲप चॅट बॉट' सेवा आपत्तीविषयक...

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची ‘व्हाट्सॲप चॅट बॉट’ सेवा आपत्तीविषयक माहिती मिळविण्यासाठी डिजिटल सुविधेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

सातारा दि.29: सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांच्या सोयी सुविधा वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत जिल्हाधिकारी कार्यालयाचा ‘व्हाट्सॲप चॅट बॉट’ तयार केला आहे. या अत्याधुनिक डिजिटल सुविधेच्या माध्यमातुन नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विषयाच्या विविध प्रकारच्या सुविधा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. जिल्हाधिकारी सातारा यांनी सातारा जिल्हयातील नागरीकांसाठी ही अनोखी संकल्पना अस्तित्वात आणली आहे.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत नागरिकांना आपत्ती विषयी माहिती त्वरीत मिळणेसाठी हि सेवा ऑनलाईन केली आहे. आता नव्याने आणलेल्या ‘व्हाट्सॲप चॅट बॉट’ सुविधेसाठी नागरिकांना 9309461982 या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सॲप संदेश पाठवावा लागणार आहे. त्यानंतर, आवश्यक सेवा पर्याय उपलब्ध होऊन त्वरित कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे ते विचारण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.

‘व्हाट्सॲप चॅट बॉट’च्या माध्यमातून सातारा जिल्हयातील नागरिकांना पहिल्या टप्प्यात 10 सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये पर्जन्यमानबाबत माहिती, धरण पातळी, नदी/पूल पाणी पातळी, रस्ते बाबत स्थिती, हवामान अंदाज (IMD), महत्वाची माहिती अथवा संदेश, नकाशे, आपत्ती दरम्यान काय करावे व काय करू नये, आपत्कालीन संपर्क व हेल्पलाईन, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा इत्यादींची माहिती नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभसेवा मिळाव्यात यासाठी ‘व्हाट्सॲप चॅट बॉट’ ही सुविधा विकसित केली आहे. या सेवेमुळे वेळ वाचून प्रशासनाची गती वाढेल आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल. ‘व्हाट्सॲप चॅट बॉट’ सेवेत आणखी सुधारणा करण्यासाठी नागरिकांचे अभिप्राय महत्त्वाचे आहेत. नागरिकांच्या सुचना व तांत्रिक सुधारणा लक्षात घेऊन सेवेत आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत.

डिजिटल सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा…

डिजिटल युगात जिल्हा प्रशासनाने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन सेवांचा दर्जा उंचावणे ही काळाची गरज आहे. जिल्हाधिकारी कार्यालय साताराचा ‘व्हाट्सॲप चॅट बॉट’ हा त्याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांनी या सुविधेचा प्रभावीपणे वापर करावा.- संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रहिवाशांच्या विरोधानंतर पीसीएमसी स्थायी समितीने पुनावळे शाळेचा जमीन भाडेपट्टा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवला

पुणे : रहिवाशांच्या तीव्र विरोधाला तोंड देत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी पुनावळे येथील शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेला भूखंड खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा...

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले : रोहित पवार

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याने बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डोके वर काढत असल्याचा दावा...

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

महा सर्वेक्षण पॉलिसीसाठी 54L एकल महिलांची ओळख पटवते, संख्या 75L पर्यंत वाढू शकते

पुणे: महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले की, अशा एकल महिलांची संख्या आता 54 लाखांच्या आसपास आहे, परंतु समाजातील या विभागासाठी...

error: Content is protected !!