महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन परिपत्रकान्वये दरवर्षी सालाबादप्रमाणे सन २०२५-२६ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्तीचे जयंती दिनाचे व राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम राबविण्याबाबत सूचना प्राप्त आहेत. भारतीय संविधान दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान स्वीकारले मुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने सातारा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात संविधानाचे प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी श्री.राहुल गावडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री.विश्वास सिद, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, श्री. निलेश घुले, श्री. उपमुख्य कार्यकारी ( सा. प्र. ) , श्री. राहुल देसाई,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं. ), श्री. राहुल कदम,मुख्य लेखा व वित्त अधिकारी, श्री. नागेश ठोंबरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( महिला व बालकल्याण ) , श्री. विद्यानंद चल्लावार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, श्री. मोहसिन मोदी, कार्यकारी अभियंता बांधकाम उत्तर, श्री.अरुणरकुमार दिलपाक, जिल्हा जलसंधारण अधिकारी, श्री, गजानन ननावरे, कृषि विकास अधिकारी, श्री, समाधान चव्हाण, लेखाधिकारी, अर्थ विभाग तसेच सर्व विभागांचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
























