हिमालयातील रहस्यमय प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण
पुणे .येथील सावरकर अध्यापन केंद्रात डॉ. अर्जुन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिमालयातील दुर्गम भागात अनुभवलेल्या रहस्यमय, साहसी आणि रोमांचकारी प्रवासाचे वर्णन करणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक मा. युवराजसाहेब ॲड. श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीने विशेष महत्त्व प्राप्त झाले.
हिमालयातील निसर्गवैभव, कठीण परिस्थिती, अनपेक्षित अनुभव आणि साहसी प्रवासाचे जिवंत चित्रण या पुस्तकातून करण्यात आले असून, उपस्थितांनी पुस्तकाच्या विषयवस्तूचे कौतुक केले. लेखकांनी आपल्या प्रवासादरम्यान आलेले अनुभव, आव्हाने आणि त्यातून मिळालेली जीवनदृष्टी याविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास योगेश सोमण, प्रदीप निफाडकर, बकुळ पराडकर, डॉ. प्रसाद जोशी तसेच रवींद्र येवले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी लेखकांचे अभिनंदन करत पुस्तकाच्या माध्यमातून हिमालयातील अद्भुत अनुभव वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले. साहित्य, साहस आणि प्रेरणादायी अनुभवांचा संगम असलेले हे पुस्तक वाचकांना निश्चितच वेगळा अनुभव देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


























