Homeताज्या बातम्याॲड. बापूसाहेब शिलवंत व ॲड. अजीम मेटकरी यांच्या प्रभावी मांडणीसमोर न्यायालयाची दखल;...

ॲड. बापूसाहेब शिलवंत व ॲड. अजीम मेटकरी यांच्या प्रभावी मांडणीसमोर न्यायालयाची दखल; पोलिसांना एफ.आय.आर. नोंद करण्याचे आदेश

फलटण :दि.१६| झडकबाईचीवाडी, फलटण-पुसेगाव रोड येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील दादासाहेब गायकवाड यांना शासनमान्य मंजुरीनंतर सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेला हिंदुस्तान पेट्रोलियमचा पेट्रोल पंप ताब्यात देण्यात आला होता. मात्र पंप सुरू होण्यापूर्वीच 23 सप्टेंबर 2024 रोजी काही व्यक्तींनी जमाव करून जातिवाचक शिवीगाळ केली, मुख्य रस्ता काटेरी तारेने अडवून आर्थिक नुकसान केले, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे.

या संदर्भात गायकवाड यांनी 9 सप्टेंबर 2024 रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये, 26 सप्टेंबर 2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्याकडे आणि 24 ऑक्टोबर 2024 रोजी पोलीस अधीक्षक सातारा येथे तक्रारी दाखल केल्या. तथापि, कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी अर्ज क्र. 32/2025 अंतर्गत विशेष न्यायालय, फलटण येथे धाव घेतली.

न्यायालयाने सर्व कागदपत्रे व पुरावे तपासून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहिता कलम 175(3) नुसार संबंधित आरोपींवर एफ.आय.आर. नोंदविण्याचे स्पष्ट आदेश फलटण ग्रामीण पोलिसांना दिले आहेत. तसेच 15 डिसेंबर 2025 पर्यंत चौकशी अहवाल न्यायालयास सादर करण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणी अर्जदार गायकवाड यांच्यातर्फे ॲड. बापूसाहेब शिलवंत व ॲड. अजीम मेटकरी यांनी जोरदार व तथ्यपूर्ण मांडणी केली.

“ही घटना केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून, कायद्याने व्यवसाय करण्याचा अधिकार मिळवलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकावरील गंभीर अत्याचार आहे,” असे मत ॲड. बापूसाहेब शिलवंत यांनी न्यायालयात मांडले.

न्यायालयाच्या आदेशामुळे टिकून राहिलेल्या तक्रारीला न्याय मिळाला असून आता पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवणे बंधनकारक झाले आहे. पुढील तपास न्यायालयीन मार्गदर्शनाखाली होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

साक्षीदार नाही, पण सुगावाचा माग: केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांनी एकत्र नांगी; पॉलीग्राफ चाचणी,...

रिया गोयल (आर) आणि तिचा कथित प्रियकर, चेतन चौधरी (एल), रिअल्टर केतन अग्रवाल (एम) च्या कथित हत्येप्रकरणी पॉलीग्राफ आणि चाल विश्लेषण चाचण्यांना सामोरे...

ऑनलाइन शेअर फसवणुकीत कात्रज दुकानदाराचे ६४ लाखांचे नुकसान

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगद्वारे जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी कात्रज येथील एका ५३ वर्षीय दुकानदाराची ६३.८५ लाख रुपयांची...

*शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!*

शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!   दूरदृष्टी, संशोधन आणि शेतकरीहितासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय कार्य भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हा...

अर्थ मूव्हरने कामगाराला चिरडले, मृतदेह बनावट हिट-अँड-रनमध्ये टाकला | पुणे बातम्या

19 जून रोजी, एक अर्थ मूव्हर कथितरित्या कामगार दुपारी झोपेत असताना त्याच्या अंगावर धावून गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. पुणे : एका कामगाराचा...

जेव्हा फुटबॉल भौतिकशास्त्राकडे झुकतो: शास्त्रज्ञ फ्री किक मॅजिक डीकोड करतात | पुणे बातम्या

पुणे : डेव्हिड बेकहॅमचे अचूक वाकणे, रॉबर्टो कार्लोसचे पॉवर-पॅक्ड लाँग रेंजर्स किंवा लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डोच्या फिरत्या फ्री किकने फुटबॉल चाहत्यांना...

error: Content is protected !!