फलटण नगर परिषदेच्या वतीने फलटण शहरातील नागरिकांना कळविण्यात येत आहे की सोमवार पेठ येथील कालवा अस्तरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून गुरुवार दि. 11 सप्टेंबर २०२५ रोजी पासून निरा उजवा कालवा वीर धरणाच्या मुखाशी बंद करण्यात आलेला आहे . शहरास पाणीपुरवठा करणारा हा निरा उजवा कालवा साधारणपणे 30 ते 35 दिवस बंद राहणार आहे . नगरपरिषदेच्या सुधारित जलकेंद्र येथील साठवण तालुक्यातील पाणी उपसा करून फलटण शहरात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या साठवण तलावातील पाणी पातळी कमी होत असल्याने आजपासून म्हणजे बुधवार दि. २४ सप्टेंबर २०२५ पासून शहरांमध्ये 30 टक्के पाणी कपात करण्यात येत आहे. तरी फलटण शहरातील नागरिकांनी दैनंदिन पाण्याचा वापर कमी करावा तसेच पुरेसा पाणीसाठा करावा व नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री निखिल जाधव यांनी केले आहे.
























