Homeताज्या बातम्याजबरी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांमधील सराईत गुन्हेगार तडीपार आरोपीला अटक

जबरी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांमधील सराईत गुन्हेगार तडीपार आरोपीला अटक

फलटण शहर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत, जबरी चोरी आणि घरफोडी सारख्या गुन्ह्यांमधील सराईत गुन्हेगार निखिल उर्फ काळू सुरेश जाधव याला अटक केली आहे. सातारा जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला हा आरोपी तडीपारीच्या आदेशाचा भंग करून शहरात दाखल झाला होता.

मा. पोलीस अधीक्षक सातारा यांच्या आदेशानुसार, फलटण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी ११ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १० च्या सुमारास दत्तनगर, सातारा रोड, हनुमाननगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना, भरधाव वेगाने येणारी एक पिकअप गाडी त्यांनी थांबवली. गाडीच्या चौकशीत, चालक निखिल जाधव हा फलटण शहरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्याला २८ ऑगस्ट २०२५ रोजी दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.

त्याने तडीपारीच्या आदेशाचा भंग करून शहरात प्रवेश केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, त्याच्या ताब्यातील पिकअप गाडीची चौकशी केली असता ती मुंबईतून चोरी केल्याचे समोर आले. या गाडीची किंमत सुमारे ५ लाख रुपये असून ती पोलिसांनी हस्तगत केली आहे.

निखिल उर्फ काळू सुरेश जाधव याच्यावर यापूर्वीही फलटण शहर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, मा. अपर अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंतकुमार शहा यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा* *रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव, तर दिलीप...

संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव, तर दिलीप शिंदे खजिनदार; लायन्स क्लब फलटणची नवी कार्यकारिणी पदस्थ   फलटण, प्रतिनिधी : समर्थ...

नाल्यांमध्ये अडकलेल्या गौरची वन पथकाने सुटका केली

गौर आपल्या कळपापासून विभक्त होऊन शहरी किनाऱ्याजवळ राहिली असावी. अन्न किंवा पाण्याच्या शोधात ते शहरात दाखल झाले असावे पुणे : सिंहगड रोडवरील विश्रांतीनगर...

किरकोळ टेम्पोसह चार वाहनांना धडक, बुक

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर वैदूवाडी येथे मंगळवारी सायंकाळी एका १७ वर्षीय मुलाने पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी चालवत असलेल्या टेम्पोने चार वाहनांना धडक दिली.वानवरी...

पुण्यातील नवीन कार्यालयासह भारतातील 500 अभियंत्यांपर्यंत कर्मचारी संख्या वाढवण्याचे जॅमकोचे उद्दिष्ट आहे

केट शेफर, कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ, जॅमको इंटिरियर्स (उजवीकडे); संजीव सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी (मध्य), जॅमको इंटिरिअर्स, नीलेश बोराडे, कंट्री हेड इंडिया, जॅमको...

*फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती*

फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी; पालखी सोहळ्याच्या तयारीसह विकासकामांना गती     फलटण प्रतिनिधी | ३० जून २०२६ समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण नगर...

error: Content is protected !!