Homeताज्या बातम्या*झाडांची कत्तल लपवण्यासाठी आकड्यांचा खेळ*

*झाडांची कत्तल लपवण्यासाठी आकड्यांचा खेळ*

📰 ब्रेकिंग न्यूज | फलटण वनविभागावर गंभीर आरोप

. फलटण.समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

“ग्लिरिसिडिया हटवली की सत्य लपवले?” — वन विभागाच्या कारभारावर संतप्त सवालांचा भडिमार

फलटण : विदेशी ‘ग्लिरिसिडिया’ हटवून तब्बल 45 हजार देशी वृक्ष लागवडीचा गाजावाजा करणाऱ्या वन विभागाच्या दाव्यांवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिक्षेत्र वनाधिकारी निकिता बोटकर यांनी दिलेल्या लेखी स्पष्टीकरणात अनेक विसंगती दिसून येत असून, प्रत्यक्ष आदेशांची एकही कागदपत्रे माध्यमांसमोर न मांडल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.

📌 आदेश कुठे आहेत? वन विभाग सांगतो की केंद्र सरकारच्या कार्यआयोजनेनुसार विदेशी प्रजाती कमी करण्याचे निर्देश आहेत. पण नेमका तो आदेश कुठे आहे? त्याची प्रत का लपवली जाते आहे? “ग्लिरिसिडिया हटवा आणि मियावाकी पद्धतीने लागवड करा” असा स्पष्ट आदेश नेमका कोणत्या कागदावर आहे? — याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

📌 झाडांची संख्या की आकड्यांचा खेळ? वन विभागाचा दावा — 632 ग्लिरिसिडिया झाडे काढली!

स्थानिक निसर्गप्रेमींचा दावा — फक्त 60 ते 70 झाडे होती!

मग प्रश्न असा —

👉 70 झाडांचे 632 कसे झाले?

👉 हा आकड्यांचा खेळ आहे का प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात इतर झाडांची कत्तल लपवली जाते आहे?

📌 अहवाल का नाही? त्या ठिकाणी आधी कोणत्या प्रजातींची, किती झाडे होती याचा सविस्तर अहवाल सादर का करण्यात आला नाही? वन विभागाकडे माहिती असूनही ती जाहीर करण्यास टाळाटाळ का?

📌 JCB पुन्हा का मैदानात? प्रश्न उपस्थित होत असतानाच संबंधित वनक्षेत्रात पुन्हा JCB मशीन सुरू असल्याचे दिसून आले आहे.

👉 अजून झाडे कापली जात आहेत का?

👉 आधीच झालेली कत्तल झाकण्यासाठी आणखी नाश सुरू आहे का?

📌 पर्यावरणाचा मुद्दा की दिखावा? देशी वृक्ष लागवडीचा दावा चांगला असला तरी,

👉 आधीची झाडे नष्ट करून “नवीन लागवड” हा पर्यावरण संवर्धनाचा मार्ग आहे का?

👉 की हा फक्त कागदोपत्री प्रकल्प दाखवून निधी वापरण्याचा प्रकार?

🔥 संतप्त नागरिकांचा थेट इशारा “वन विभागाने तात्काळ सर्व आदेश, अहवाल आणि प्रत्यक्ष मोजणीची माहिती सार्वजनिक करावी. अन्यथा हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा निसर्गप्रेमींकडून देण्यात आला आहे.

👉 आता खरा प्रश्न —

वनसंवर्धनाच्या नावाखाली नेमकं चाललंय तरी काय?

ही वृक्षलागवड आहे की वृक्षसंहार लपवण्याचा डाव?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बाणेर आणि बालेवाडीत टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली ‘स्मार्ट’ टॅग हरवला

पुणे: एकेकाळी 'स्मार्ट सिटी' झोन म्हणून ओळखले जाणारे बाणेर-बालेवाडी आता स्मार्ट, अवाजवी कचरा, अस्ताव्यस्त कचरा उचलणे आणि आगीच्या भक्ष्यस्थानी जाणाऱ्या कचऱ्याच्या धूराने भरलेल्या रस्त्यांशिवाय...

पुण्यातील 3 वर्षीय बलात्कार-हत्या प्रकरण: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड आंदोलन

पुण्यातील 3 वर्षीय बलात्कार-हत्या प्रकरण: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड आंदोलन पुणे : तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर शनिवारी पुण्यातील शेकडो आंदोलकांनी...

*इंग्रजी बहि. स्थ(इग्रजी एट्रन्स) परीक्षेत मुधोजी हायस्कूलचा डंका*

इंग्रजी बहिःस्थ (इंग्रजी - एन्ट्रन्स् )परीक्षेत मुधोजी हायस्कूलचा डंका   कु. कृपा प्रशांत रणवरे राज्यात तिसरी फलटण दि ०३ मे २०२६:- समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क भारती विद्यापीठा अंतर्गत...

नसरापूर बलात्कार-हत्या: मुख्यमंत्र्यांनी फास्टट्रॅक खटला चालवण्याचे आश्वासन दिले, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

पुणे: भोर जिल्ह्यातील नसरापूरजवळ तीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्कार आणि खूनाची घटना अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह असल्याचे वर्णन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

महंमदवाडीतील तीन ओव्हरहेड टाक्यांमध्ये पाणी पोहोचले आहे

पुणे : महानगरपालिका प्रशासनाने शनिवारी पारेषण लाईन टाकण्याचे काम पूर्ण केल्याने महंमदवाडी परिसरातील तीन ओव्हरहेड टाक्यांमधून १० मेपर्यंत पाणी घरांच्या नळांपर्यंत जाईल.पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी)...

error: Content is protected !!