Homeताज्या बातम्या*श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप साहेब यांच्या...

*श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय _साहित्याचे_ वाटप; साखरवाडीतील उपक्रमाचे कौतुक*

फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क

साखरवाडी (ता. फलटण) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमाअंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल तसेच इतर आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना अल्पोपहारही देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकत होते.

कार्यक्रमास आश्रम शाळेचे सचिव तसेच ग्रामपंचायत सदस्य हरीश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविणे ही सामाजिक बांधिलकीची जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भविष्यातही अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, या अभिनव उपक्रमामुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरातही या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे. सामाजिक जाणीव जपत वाढदिवस साजरा करण्याचा हा आदर्श इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘लग्न जे कधीच होणार नाही’: सिया गोयलचा मित्राला ‘स्नॅपचॅट मेसेज’ व्हायरल झाला

सिया गोयलचा समावेश असलेल्या स्नॅपचॅट संभाषणाचा कथित स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी तिला न्यायालयीन कोठडीत...

‘लग्नाचे 4 महिन्यांचे नियोजन’: सिया गोयलचा मंगेतर केतन अग्रवालचा जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांचा मृत्यूच्या काही दिवस आधी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पुन्हा ऑनलाइन व्हायरल झाला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल, त्याच्या...

*राष्ट्रीय पिंच्याक सिलट स्पर्धेत योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश*

*राष्ट्रीय पिंच्याक सिलट स्पर्धेत योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश*   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क   नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या योद्धा...

पावसात झाडांना टँकरने पाणी दिल्याने संताप

नागरिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली असून, पाण्याचा असा अपव्यय तातडीने थांबवावा. पुणे : शुक्रवारी मुसळधार पाऊस...

पुण्यात विदेशी भाज्यांचे दर वाढल्याने निरोगी खाण्याला प्रीमियम मिळतो

उशीर झालेला मान्सून आणि अनियमित पावसामुळे पिकांचे चक्र विस्कळीत झाले आहे आणि उत्पादनात घट झाली आहे ज्यामुळे विदेशी भाज्यांचे दर वाढले आहेत. पुणे...

error: Content is protected !!